पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेद. किंवा नाहीत हैं तो पहात असतो. त्याच्या नियमास अनुसरून द्यावापृथ्वी ही निराळी राहिली आहेत. वरुणाने सूर्य निर्माण केला, आणि त्याच्यासाठी विस्तीर्ण वाट करून दिली. वायु हा वरुणाचा श्वासोच्छास आहे. वरुणाच्या आज्ञेनें चंद्र व नक्षत्रे रात्री प्रकाशतात आणि दिवसां नाहीशी होतात. त्याच्याच अतक्ये शक्तीने पाऊस पडतो, जमीन भिजते आणि डोंगर मेघाच्छादित होतात. हा अपांपति आहे. पक्ष्यांची उड्डाणगति, नौकांचा समुद्रांतील मार्ग, वायूची गति व प्रदेश या सर्व गोष्टी वरुणाला माहीत असतात. उत्पन्न झालेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व वस्तु त्याच्या लक्षात असतात. मनुष्यांची खरी खोटी कर्मे तो नेहमी पहात असतो. वरुणाच्या आज्ञशिवाय पापणी सुद्धां लवत नाही. मनुष्यांच्या पापाबद्दल तो त्यांस शिक्षा करतो व पाशाने बांधून टाकतो. 'वरुणाच्या व्रताचा भंग झाला असतां, क्षमा करा' अशी त्याची प्रार्थना केली तर तो पापांचे क्षालन करतो. पूर्वजांनी केलेल्या पापापासून सुद्धां त्यांच्या संततीची मुक्ति करतो. उदरासारखे रोग वरुण बरे करतो. आतां वरुण हा उदकांचा पति एवढीच भावना राहिली आहे. सूर्याच्या निरनिराळ्या गुणांवरून आणि त्याच्या पराक्रमाप्रमाणे त्याचें पांच स्वरूपांत वर्णन ऋग्वेदांत आले आहे. 'मित्र' हा प्राण्यांचा स्नेही आहे. तो चर्षणीचे ( प्रजेचें) पालन करतो. मित्र आणि वरुण यांची जोडी आहे. मित्रा