पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. गार्हपत्य, दक्षिणाग्नि आणि आहवनीय, अशा तीन अग्नींचें अन्वाधान (स्थापन) करण्याची चाल पडली असावी. आग्नि घरोघरीं प्रत्येक दिवशी प्रज्वलित होतो, म्हणून त्याला तरुण असें म्हणतात. स्वतः अमर असून स्वर्ग लोकांतून येऊन तो मात राहिला आहे. तो अनेक प्रकारची रूपें या जगांत धारण करतो म्हणून त्यास अनेक नरनिराळी नांवें मिळाली आहेत. सर्व देव त्याच्या पोटांत आहेत. चाकाचे आयस पुठ्ठा किंवा पाट जसें आवरून धरतात त्याप्रमाणे अग्नीने सर्व देवांस आवरून धरले आहे वैश्वदेव केल्यावर अग्नीची प्रार्थना करीत असतां त्याच्या जवळ यजमान जे जे मागतो ते व तशाच तन्हेच्या देणग्य आनि मनुष्यास देतो, असें सामान्यतः धरून चालले तर हरकत नाही. अग्नि हा पुरोहित (ब्राह्मण) आहे. इन्द्र राजा व योद्धा आहे. वरुण हा वेदांतील देवांपैकी एक श्रेष्ठ देव आहे. वेदाच्या पूर्वी व आरंभकाळीं वरुणाची फार महती होती. वरुण शब्दाचा अर्थ आवरण करणारा किंवा आकाश असाच असावा. इंद्र, अग्नि व सोम यांच्या सूक्तापेक्षा रुणाची सुक्ते पुष्कळच कमी आहेत. तथापि त्या सत्तांत नीति व भक्ति यांचा बराच अविर्भाव दिसून येतो. वरुण राजाचा अधिकार नैतिक आणि भौतिक सृष्टीवर चालूं असतो. त्याने सष्टीस नियम घालून दिले आहेत, आणि त्या नियमांप्रमाणे (ऋताप्रमाणे ) सर्व वस्तु चालताहेत,