पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वद. भाले व परशु असतात. डोक्यावर शिरस्त्राण असते. ते अंगावर दागिने घालतात आणि सोन्याच्या रथांत बसून हिंडतात. लढाईच्या कामी इंद्रास त्यांची मदत असते. ते पाऊस पाडतात. अग्नीच्या बरोबरहि कधी कधी मरुद्गण जातात. त्यांची संख्या २१ आणि १८० अशी दिली आहे. वायु किंवा वात यांचेंहि वर्णन ऋग्वेदांत आले आहे. ___ अग्नि हा सर्व यज्ञकर्मात प्रधानसाधन असल्यामुळे तो सर्व देवांत मुख्य देव आहे. अग्निसूक्तें दोनशेहून अधिक आहेत. अग्नि हा यज्ञाचा देव आहे. तो ऋत्विज आहे. सर्व देवतांस दिलेले हविर्भाग तो त्यांस पोंचवितो, म्हणून त्यास हव्यवाहन असें नांव आहे. तो यजमानाचे कल्याण करितो. सहस्र नेत्रांनी त्याचे रक्षण करून त्याच्या शत्रंस जाळून टाकतो, संपत्तीचा तो निधि आहे. जातवेद रत्नधातम आणि गृहपति असा अग्नि आहे. तो यजमानांचें कल्याण करतो, त्यांस संपत्ति व संतति देतो आणि त्याचं वैभव वाढवितो. जुने नवे सर्व ऋषि त्याची स्तुति करितात. अग्नि राक्षसादि दुष्टांचा नाश करतो, म्हणून त्याला रक्षोहन असेंहि नांव आहे. अग्नीचा तीन स्थानी जन्म होतो. धुलोकांत, अन्तरिक्षांत, आणि पृथ्वीवर; किंवा स्वर्गात, पृथ्वीवर आणि जलांत, अशा तीन ठिकाणी त्याचा जन्म होतो. म्हणून त्याची तीन स्वरूपे आहेते असे मानले गेले आहे. सूर्य, वायु किंवा इंद्र आणि अग्नि ही त्याची तीन रूपें होत. ह्याच कारणावरून कदाचित् अग्निहोत्रांत