पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. विल्या आणि त्या त्यांच्या मालकांस दिल्या; नद्यांना वाट करून दिली; पर्वतांचा ( अद्रींचा ) भेद केला, असें मंडल १०-८९-१७ यांत त्याचे वर्णन आहे. इंद्राचे वृत्रहन् हे नांव प्रसिद्ध आहे. याने अद्रींचा भेद करून त्यांवर असणारी ९०, ९९ आणि १०० पुरें मोडून टाकली आणि तेथील रहाणारांस खाली ढकलून दिले. इंद्र हा मोठा योद्धा होता. ह्मणून शत्रूचा पराजय करण्याचे कामी त्याचे साहाय्य पृथ्वीवरचे आर्य लोक नेहमी मागत असत. इन्द्राने पृथ्वीला स्थिर केलें. पर्वतांना एका ठिकाणी खिळून टाकलें; अन्तरिक्षास मापिलें आणि आकाशास धिरा दिला. (२, मं. २, २). इन्द्राला सोम पिण्याची फार आवड असे. सोम पिऊन तो वल्गना करी. (मं. १०-११९ पहा.) ___ रुद्रांचे वर्णन तीन चार सूक्तांतच आहे. हे देव मोठे भयंकर व क्रूर आहेत. यांच्या हातांत धनुष्यबाण असतात; कधी कधी त्यांच्याजवळ वज्र व विजेचा तीर, ही असतात. बहुधा रुद्रांच्या इषु व मन्यु यांची प्रार्थना रक्षणार्थ केली असते. आपदापासून रक्षण करा येवढेच नाही, तर मनुष्यांचें व पशुंचे कल्याण करा आणि त्यांस शर्म द्या, अशी रुद्रांस विनंति केलेली आढळते. रुद्रांच्या अंगीं, रोग बरे करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. यामुळे या कामींहि त्यांचे साहाय्य मागतात. मरुद्गण हे मोठे बलाढ्य, शर व भयंकर असे देव आहेत. हे रुद्र व पृश्नी यांचे पुत्र होत. यांच्या हातांत