पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार. अविद्या, माया, किंवा अज्ञान याचा अध्यास त्या वस्तूवर झाल्याकारणाने हे जगत् किंवा हा संसार आहे तसा दिसतो; वस्तुतः तो संसार सत् नाहीं; कारण ज्ञानाच्या योगाने हा अध्यास नाहीसा होतो आणि सत्स्वरूपाचा साक्षात्कार होतो. जगत् मिथ्या आहे, असे म्हणण्याचे कारण हेच आहे. यथार्थ ज्ञानाने जीव व परमात्मा ह्यांच्या ऐक्याची प्रतीति करून घ्यावी. ही खूणगांठ एकदा मनांत बसली, म्हणजे भेदाभेद उरत नाही, आणि केवल ज्ञानावस्थेत मनुष्य रहातो. ही कायमची आनन्दमय अवस्था. ती प्राप्त झाली ह्मणजे सर्व कार्य झाले. अद्वैत वेदान्त्याच्या विचारांची मजल येथपर्यंत येऊन पोचली आहे. बुद्धमहामुनीनी विचारांती सर्व दुःखमय, क्षणिक आणि शून्यच आहे, असें ठरविले. अहिंसा, सत्य, अस्तेय, शुचिभूतपणा, इत्यादि सदाचरणांनी धर्मसंचय करून एकदा निर्वाण प्राप्त झालें, म्हणजे सर्व काही झाले. जैनांस सर्वज्ञ व्हावे असे वाटते. सम्यक्ज्ञान, सम्यक्चारित्र आणि जिनोपदेशावर श्रद्धा यांनी मोक्ष मिळेल. तेंच त्यांचे साध्य आहे. चार्वाकांचे मत तर काही विलक्षण दिसते. तथापि त्यांच्या मनाची अशी प्रवृत्ति का व्हावी, ह्याचा विचार करणे योग्य आहे. ते म्हणतात देहाची एकदा राख झाली की, पुनः त्याविषयी काही विचार नाही. जिवंत आहोत तोपर्यंत चैन करून घ्यावी. ऋण काढून सण करावा. ऋणं कृत्वा घृतं पिब. मेल्यावर पुढे पाठीमागे कांहीं एक रहात नाही. आपल्या विद्वान सत्त्वान्वेषी, तत्त्वज्ञानी पूर्वजांच्या विचारोघांच्या अशा भिन्न भिन्न दिशा आहेत. ह्या विचाराची प्रौढता, अगाधता, त्यांचे गांभीर्च, त्यांच्या प्रवाहाची - - --