पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. प्रसन्नता, त्यांत दिसणारे युक्तिवादाचे कौशल्य, विषयमहती आणि सत्य शोधण्याच्या कामी बुद्धीचे परिश्रम ह्या सर्व गोष्टी आपण जे त्यांचे वंशज, त्यांस अवगत असाव्यात, येवढेच नाही, तर आपल्या विचारांनी ज्ञानांनी, आणि सत्यशोधक बुद्धीने पूर्वकालीन विचारोघांशी नवीन ज्ञानप्रवाहांचा संगम करून त्यांचा विस्तार करावा आणि मनुष्यमात्रांस त्याचे सेवन करता येईल अशा रीतीने त्या ओघांस दिशा लावावी, हे आपले कर्तव्य आहे. ह्या कामी परिश्रम करणे हे राष्ट्र हिताचे आहे. ज्या लोकांची पूर्वकालाची परंपरा सुटली, किंवा पूर्वीपासून आलेला तात्त्विक, धार्मिक, नैतिक, परंपरागत, आनुवंशिक किंवा पिढ्यानुपिढ्या चालत आलेला व्यवहारक्रम मोडून गेला, किंबहुना, ज्या लोकांस पूर्वइतिहासच नाही, किंवा ज्यांचा असलेला इतिहास नष्टप्राय होत चाललेला आहे, अशा लोकांस राष्टत्वपद लवकर मिळण्याची आशा थोडी असते. अशा दृष्टीने ह्या जुन्या विद्यांकडे पाहिले असतांहि, आपणांस त्यांची माहिती असणे, हे फार इष्ट आहे. अज्ञानांत पुरून जाऊन नाहीसा होऊ घातलेला हा ज्ञानकोश बाहेर पडून त्यांत भर पडत जावो, अशी परमेश्वराची प्रार्थना करून हा लेख येथे संपवतों. hinewww Home RN. M