पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ प्रस्थानभेद. करून घ्यावें, म्हणजे त्या तत्त्वज्ञानापासून निश्रेयस प्राप्त होते. सांख्यानुयायी म्हणतात की हा संसार पुरुष व प्रकृति यांचा खेळ आहे. प्रकृति ही मोठी नाटकी आहे. हिच्यापासून महत् अहंकार बुद्धि वगैरे तेवीस तत्त्वे निमार्ण झाली आहेत. यदृच्छेने पुरुषाची आणि प्रकृतीची गांठ पडते आणि तिच्या जाळ्यांत सांपडून हा प्रपंच तो पुरुष करतो, आणि सुखदुःखादि भोगीत असतो. प्रकृतीचे खेळ ओळखून पुरुषांस आत्मज्ञान झाले म्हणजे प्रकृतिरूपी ही नर्तकी रंगभूमीवरून निघून जाते आणि तो मुक व सुखी होतो. योगशास्त्राचे मत असे आहे की नियमादि आठ साधनांनी चित्तवृत्तीचा निरोध करावा आणि एकात्र चित्तानें ध्यान करून समाधि लावावी. ह्या अवस्थेत बाह्य वस्तूंचे भान रहात नाही आणि परमेश्वराशी ऐक्य होऊन तन्मयत्व होते. हेच निश्रेयस होय. पूर्वमीमांसेची भिस्त पर्वस्वी कर्मावरच. इतर मतें जोरावल्या मुळे कर्माची हानि होत चालली, त्याचा प्रतिकार करण्यां कारतांच कर्मवाद्यांनी पुनः प्रयत्न केला असें ह्या मीमांसे - वरून दिसते. भाक्त ही एकप्रकारचे कर्मच आहे, असें मानन भाक्तिमार्गाचा समावेश कर्ममार्गात काणी करतात. भाक्तमार्गी आणि द्वैतवादी वेदान्ती यांची विचारसरणी सामान्यतः समानच असते. आपले आराध्य दैवत किंवा परमेश्वर हा सर्वज्ञ सर्वसाक्षी कर्ता करविता दयाघन असा आहे, असा भाव धरून आराधनेच्या नानाविध मार्गाने त्या परमेश्वराशी सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तीपैकी कोणती तरी मुक्ति प्राप्त करून घेतली तर न्यांतच परमसुख आहे, असे ते मानतात. अद्वैत वेदान्ती लोकांच्या मताप्रमाणे अनिर्वचनीय अशी एकच वस्तु आहे.