पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५३ उपसंहार. आणि ब्राह्मणांत विशेषतः ह्या कर्माचे देव, मंत्र, रतुति, प्रयोग, विनियोग व सामान्य तंत्रं सांगितली आहेत. सृष्टीतील वरतूंविषयीं अनुभव, विचार, आणि त्यापासून ज्ञान, ही जसजशी वाढत गेली तसतशी कर्मफलावरची श्रद्धा आणि त्यापासून होणाऱ्या सुखाची अभिलाषबुद्धि कमी कमी होत गेल्या. ब्राह्मणांच्याच शेवटच्या भागांत किंवा. अरण्यकांत हे वृत्यन्तर दिसून येते. कर्मापासून होणारी सुखप्राप्ति आणि दुःखपरिहार ह्यांत समाधान मानणाऱ्या चित्तवृत्तीची पिच्छेहाट होऊन त्यांचे स्वरूपान्तर कसकसे होत गेले च शेवटी कर्मापासून होणारें सुख शाश्वत नाहीं, व दुःखापासून ते अलिप्त नाहीं, संसार दुःखमय, अशाश्वत आहे, खरें, शाश्वत, निरन्तर सुख ज्ञानावांचून मिळणार नाही, ज्ञान संपादनाविषयींच यत्न केला पाहिजे, अशी अन्तःकरणांत भावना जागृत होऊन तिचा पगडा कसा बसला! यांचा निर्णय करणे शक्य नाही. तथापि येवढी गोष्ट मात्र निर्विवाद आहे, की उपनिषदें ज्यावेळी झाली त्यावेळी विचारी मनुष्यांचे अन्तःकरण असल्या विचारांनी अगदी व्यग्र झालें होते. दुःखमय संसार जाऊन शाश्वत सुख कसे मिळेल ह्या प्रश्नाचा विचार अनेक तत्त्ववेत्त्यांनी आपापल्या बुद्धि सामर्थ्यांप्रमाणे केला आहे; आणि निश्रेयस मिळविण्याचे उपायही सुचविले आहेत. वैशेषिक मतांप्रमाणे, ह्या जगांत सहा किंवा सात मूलतत्त्वे ( पदार्थ) आहेत. त्यांच्या परस्पर संबन्धाविषयीं विवेक करून, प्रत्यक्ष अनुमान मननादिकांच्या साहाय्याने ईश्वरसाक्षात्कार करून घेतला, म्हणजे संसारदुःखाचा नाश होऊन सुख मिळते. नैयायिक म्हणतात की प्रमाणप्रमेयादि सोळा पदार्थाचे तत्त्वज्ञान