पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. गाच्या आरंभापासून आजपर्यंत ह्या बलवत्तर वासनेच्या सर्वकष " सर्वीस ओढून नेणाऱ्या" प्रवाहांत आम्ही वाहत चाललो आहोत, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. विचार, अनुभव व ज्ञान ह्यांच्या योगानें सुखदुःखांच्या स्वरूपांत अन्तर पडेल, आणि त्यांच्या संपादनाची व परिहाराची साधनेंहि नवीं नवीं अशी शोधून काढण्यात येतील. तथापि हेय आणि उपादेय (दुःख आणि सुख ) ह्या वस्तु जगांत रहाणारच. वेदकाली, थंडो, हिम,बारे अंधकार मेघ इत्यादि अद्भुत, भीतिप्रद सृष्टीतील चमत्कार, असुर, तसेच ज्वर, उदर, यक्ष्मा इत्यादि शरीररोग, भ्रातृव्य, (शत्रु ) दस्यु, इत्यादि "यश्च नोद्वेष्टि यंच वयं द्विष्मः" असे लोक, व अशा वस्तु: दुःखकारण मानिल्या जात असत. यांचा परिहार अगिरानी आणलेल्या अग्नीच्या यजनाने व अग्नीच्या द्वारानें भूर्भुवः स्वर लोकांतील देवांच्या यजनांनी त्या वेळचे लोक करीत . असत. देवांस संतुष्ट करण्याच्या कामी मंत्र, तंत्र, व त्यांचे पर्याय, यजमानाचे अस्तिकबुद्धीप्रमाणे आणि सामानुरूप : वाढत गेले. पुष्कळ बलाढ्य वीर, मुलेबाळें, गुरे ढोरे, : अन्नवस्त्र, पाणी, धन, प्रतिष्ठा, आयुप्य, तेज, ब्रह्मवर्चस, :: ग्रामणीत्व, राष्ट्राधिपत्य, सोमपान, आणि स्वर्गप्राप्ति, ह्या आणि अशाच प्रकारच्या वस्तु सुखकारण आहेत, असें वेदकालीन लोक मानीत असत. ह्या सुखद वस्तूंची साधनें यज्ञयागादिकच आहेत, असे त्यास वाटे. म्हणून यज्ञ-.यागादि कर्मानी देवांस संतुष्ट करून त्यांपासून इष्ट वस्तु - प्राप्त करून घेण्यांची आणि अनिष्टवस्तूंचा परिहार करण्या-... विषयी त्यांची नेहमी खटपट चालं असे. वेदांच्या संहितेत