पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार दिसू लागला नाही. ह्या कामी सध्या इतकी अवनति झाली आहे की पूर्वीचे कित्येक ग्रन्थ नामशेष होऊन बसले आहेत. काहींचे तर 'नामापि न ज्ञायते' अशी त्यांची वाट लागली आहे. वेदांतील किंवा शास्त्रांतील एखाद्या बिकट गोष्टीविषयीं खुलासा करून घ्यावयाचा असल्यास आमच्यासारख्यांस पाश्चिमात्य विद्वानांच्या प्रथाकडे धांव घ्यावी लागते. हा प्रकार खरोखर अनिष्ट आहे. ह्या लहानशा पुस्तकांत थोड्याशा माहितीवरून आपले जुने मुख्य मुख्य ग्रन्थ कोणते आहेत, त्यांच्यांत काय काय विषय प्रतिपादिले आहेत येवढी तरी माहिती वाचकांस मिळेल, अशी आशा आहे. ही माहिती आमच्य पैकी शेकडा नव्वदांस आजमित्तीस नाही. ती लोकांच्या पुढे ठेविली असतां एकंदरीत समाजाला फायदा होईल, असें जाणून हा प्रयत्न केला आहे. मनुष्यमात्रांतच काय, परंतु सर्व प्राणीमात्रांत एक प्रबल अनिर्वचनीय अशी भावना निसर्गतः प्रवृत्त झालेली असते. स्वरक्षण, किंवा आत्मभृति, ही ती भावना किंवा वासना होय. हिच्यामुळेच सर्व मनुप्यांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक व्यापार मग ते प्रेरित असोत किंवा अप्रेरित असोत, एकसारखे चाललेले असतात. अनुकूल वेदनीय जे सुख ते आपल्यास हवेमें वाटते; प्रतिकूल वेदनीय में दुःख तें नकोसे वाटते. दुःख टाळणे आणि सुख संपादणे, याकामीं आमरण मनुष्याचे अश्रान्त श्रम चालले असतात. आतां अमूक एक वस्तु सुखावह कां ? आणि अमूक एक दुःखावह का. हे मात्र कळत नाही. ह्या स्वरक्षणाच्या भावनेस घेऊन प्राणी जन्मास का येतात, त्या भावनेची उत्पत्ति अन्तःकरणांत का व कशी झाली आह! ह्या सर्व गोष्टी अद्यापि विचारातीतच आहेत. परंतु ज