पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार. प्रस्थानभेद किंवा हिंदुधर्मात मानिलेल्या चवदा विद्या यांच्याविषयी अगदी संक्षिप्त माहिती वर दिली आहे. याशिवाय नास्तिक मते अशी मानलेली दर्शनें, यांविषयींहि .. थोडीबहुत हकीगत सांगितली आहे. ह्या मतांचा परिणाम आपल्या प्रस्तुतच्या धर्माचरणावर मोठा झाला आहे, - म्हणून त्यांविषयी काही तरी लिहिले पाहिजे. ही गोष्ट वर . नमूद केलीच आहे. ह्या सर्व विषयांत प्रवेश करून देतील व त्यासंबन्धाने बोलण्याचा अधिकार अंशतः तरी प्राप्त . करून देतील अशा योग्यतेचे ग्रन्थ मराठीत लिहिले, तर ते उंटाच्या ओझ्या येवढे होतील. असे म्हणण्यांत अतिशयोक्तीची छटा सुद्धा नाही. हे काम एका सामान्य व्यक्तीचे हातून होण्यासारखे नाही. संघसाहाय्य आणि संघाचा उद्योग त्यांनी असली कामें होत असतात, कालचक्राच्या नेमिक्रमाने मनु बदलला, परिस्थिति पालटली, अशा स्थितीत पूर्वकालीन विद्याविषयीं व्यासंग सुटाया, व त्यांचा लोप होत जावा, ह्यांत नवल नाही. त्या विद्यांचे चिंतन चालं. ठेवणे आधुनिक ज्ञानाच्या साहाय्याने पूर्वीच्या सिन्धान्तांत फेरबदल होण्यासारखा असल्यास तो करणे, त्या सिद्धान्तांत विचारांनी आणि शोधांनी भर पाडणे, आणि अशारीतीने विचारप्रगतीचे पाऊल एकंदरीत पुढे पडेल असा प्रयत्न चालू ठेवणे, असले उद्योग अशा प्रतिकूल स्थितीत सुरू राहिले, तरच भाग्य, हा विशेष आमच्या समाजांत आजून