पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૪૮ प्रस्थानभेद. षण-उपवास ) करून जैनलोक ह्या ग्रन्थाचे पठन करतात. महावीर्याचे निर्याणानन्तर, सुमारे ९०० वर्षांनी, म्हणजे इ. सनाचे पांचव्या शतकांत भद्रबाहूनें कल्पसूत्र हा ग्रन्थ पाली ( मागधी ) भाषेत लिहून, त्यांत महावीराचें चरित्र वर्णिले आहे. देवद्धिगणिन् याने जैनमताचे पाली भाषेत असलेले अनेक ग्रन्थ गोळा करून इसवी सनाचे दहाव्याअकराव्या शतकांत ते संस्कृतांत प्रणीत केले, असें पाश्चिमात्य लोकांचे मत आहे. ____हिंदुधर्मात कालगणनेत जसे कल्प मानिले आहेत, तसेच जैनांनी कालाचे दोन मोठे भाग केले आहेत. त्यांची अवसर्पिणी आणि उत्सर्पिणी अशी नावे आहेत. ही कालचक्रं मानून त्यांत सहा सहा आरें ( युगें ) आहेत असे जैन मानतात. प्रत्येक आऱ्यांत मनुष्याच्या सुखदुःखाचें मान कमीजास्ती असते. अवसर्पिणी चक्राचा फेरा संपला म्हणजे उत्सर्पिणीचा फेरा सुरू होतो. दुसऱ्या फेऱ्यांत आन्यांचा क्रम पहिल्याच्या उलट असतो. अवसर्पिणींतील आरे, त्यांतील लोकस्थिति, व वर्षसंख्या खाली कोष्टकांत दिली आहे. त्यावरून कालाविषयीं जैनांची केवढी अगाध कल्पना होती, हे सहज दिसून येईल. प्रत्येक सपिणीकालावधीत ६३-शिलाखी ( श्लाध्य ) पुरुष होऊन जातात. त्यापैकी २४ ऋषभादि सारखे तीर्थकार होतात. १२ भरतासारखे चक्रवर्ती राजे निपजतात. ९ राम, बळरामाप्रमाणे बलदेव होतात. लक्ष्मण, व कृष्ण यांच्यासारखें ९