पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्हदर्शन. २४७ - २५० वर्षे, पार्श्व तीर्थकार होऊन गेला. ऋषभ हा त्यांचा पहिला तीर्थकार. भागवतांत वर्णिलेला ऋषभ आणि जैन ऋषभ हे एकच असावेत असे काही लोकांचे मत आहे. नेमीनाथ, पार्श्वनाथ महावीर स्वामी वगैरेची नांवें प्रसिद्ध आहेत. सम्मतशिखर; पालीठाणे, राजगृही इत्यादि ठिकाणी तीर्थकारांचे निर्याण झालेले आहे, म्हणून त्या ठिकाणी जैनाची आजून मोठी जत्रा भरत असते. वर सांगितले त्या दोन जैन पक्षांत अनेक भेद झाले आहेत. सध्या त्यांचे एकंदर ८४ गच्च किंवा शाखा झाल्या आहेत. जैनांचे ग्रंथ पाली (किंवा मागधी ) भाषेत लिहिलेले आहेत. त्यांनी आपले स्वतःचे वेदशास्त्रादि ग्रंथ केले आहेत. ह्या सर्व ग्रंथांत कल्पसूत्र हा मुख्य ग्रंथ आहे. ह्यांत ४५ आगम आहेत. १२ * अंगसूत्रे, १२ उपांगसूत्रे, १० पकिप्णक (पयन्ना) ६ च्छेद, ४ मूळसूत्रं, १ नंदिसूत्र व १ अनयोगसूत्र ह्या आगमांशिवाय, कल्पसूत्रांत महावीर स्वामीचें चरित्र आठ अध्यायांत वर्णिले आहे. भाद्रपदमहिन्यांत पज्जसण ( पy

  • बारा अंगसूत्रांची नांवें. १ आचारांगसूत्र, २ सुघडांगसूत्र, ४ ठाणांगसूत्र, ५ भगवतीसूत्र, ६ ज्ञातासूत्र, ७ उपासकदशा, ८ अंतगडसूत्र, ९ अणूत्तर उवईसूत्र, १० प्रश्न व्याकरण सूत्र, ११ विपाकसूत्र व १२ दृष्टिवादसूत्र. उपांगसूत्रांची नांवेंः--१ उववाई, २ रायपसेणी, ३ जीवाभिगण, ४ पन्नवणा, ५ जंबुद्वीप पनात्त, ६ चंदपनत्ति,७ सूरपनत्ति,८ निर्यावलि, ९ कापिया १० पुन्पिया, ११ पुप्पचोळिका, व १२ वेणीदसा,