पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद. १३ सूर्य (याची पांच स्वरूपें मित्र, अर्यमा, विष्णु, सविता आणि पुषा. ) अश्विनीकुमार, उषस्, वरुण, रुद्र, मरुत्, वायु, पर्जन्य, यम, प्रजापति, द्यौ ( आकाश ) इत्यादि देवतांच्या पराक्रमादिगुणांचे वर्णन, त्यांची स्तुति प्रार्थना व अशा अनेक गोष्टी ऋग्वेदांत आल्या आहेत. सृष्टीतील अनेक अद्भुत चमत्कार पाहून आपल्या पूर्वजांच्या मनांत विस्मय उत्पन्न झाला, आणि हे चमत्कार निरनिराळ्या देवतांचे आहेत अशी त्यांच्या मनांत भावना उत्पन्न झाली. ऋषींनी केलेले हे देवतांच्या प्रभावादिकांचे वर्णन केवळ रूपकच आहे, अशी आधुनिक विद्वानांची समजूत आहे. या सर्व देवांचे गुण किंवा पराक्रम व अधिकार यांचे सविस्तर वर्णन येथे देता येत नाही. तथापि त्यांतील सुप्रसिद्ध देवांचे गुण किंवा ऐश्वर्याविषयी थोडीबहुत माहिती पुढे दिली आहे. इन्द्र हा सर्व देवांत प्रमुख देव आहे. सर्वात तो बलिष्ठ, वीर्यवान् , व तेजस्वी असा आहे. ' इन्द्रो वै देवानामोजिष्ठो बलिष्ठः' असें कौषितकी ब्राह्मणांत म्हटले आहे (६, १४). याने सोम पिऊन मरुतांच्या साहाय्याने वृत्रासुराशी धनघोर युद्ध करून त्यास आपल्या वज्राने ठार मारले. आणि ढगांतून पाणी बाहेर जाण्यास वाट खुली करून दिली. नद्यांचा प्रवाह तो नेहमी चालू ठेवतो. सारांश, तो पाऊस पाडतो. विद्युत् ही त्याचे वज्र होय. ह्या कामाबद्दल इंद्राची स्तुति वारंवार केली आहे. इंद्राने वृत्रास मारले, गाई सोड - -