पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. अनन्तचतुष्टय (काल, आकाश, परमाणु व जीव) प्राप्त झाले म्हणजे आत्म्यास मुक्ति मिळते. श्वेतांबर आणि दिगंबर, असे जैन साधूंचे दोन पक्ष असतात. श्वेतांबर आपल्या मस्तकावरचे केश काढतात. मळिन वस्त्र परिधान करतात व भिक्षेवर उदरनिर्वाह करतात. ते निःसंग आणि क्षमाशील असे असतात. दिगंबरहि आपल्या मस्तकावरचे केश कापतात. त्यांच्या हातांत मोराची पिसें व भांडे, ही असतात, अन्न देणान्याच्या घरी ते उभ्याने जेवतात. केवल व स्त्री यांचा उपभोग ते घेत नाहीत. ते मोक्षास जातात, असा हा त्या दोन पक्षांत भेद आहे. ___ जैन मताचा प्रचार बुद्धाच्यावेळी होता. महावीर किंवा वर्धमान हा जैनमताचा मुख्य प्ररथापन करणारा आहे. महावीर आणि बुद्ध हे एका वेळीच हिंदुस्थानांत आपापल्या धर्माचा प्रसार करीत होते. दोघेहि समकालीन होते. बुद्धालाहि जिन म्हणतात. युगायुगान्तरी जिन मताचा उपदेश करणारे आणि त्याचा प्रसार करण्यास झटणारे असे अनेक सर्वज्ञ गुरु होऊन गेले, असें जैनांचे मत आहे. ह्या गुरूंस ते तीर्थकार म्हणतात. च्यवन, जन्म, दीक्षा, केवल आणि मोक्ष ही पांच कल्याणे ज्यास प्राप्त झाली आहेत, त्यास तीर्थकार हे नांव मिळते. बौद्ध लोकहि त्यांच्या मताचा प्रसार करण्याकरता वेळोवेळी महापुरुषांचे अवतार होतात, असे मानतात. जैनांचे आजपर्यंत २४ तीर्थकार होऊन गेले. महावीर हा चोविसावा होय. ह्याच्या पूर्वी