पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४५ अहंदर्शन. येत नाही. ); असे हे जैनमतांतील न्यायाचे सात भंगी म्हणजे प्रकार किंवा वाद करावयाच्या रीती असतात. जनांचे असे म्हणणे आहे की, आमच्या सप्तभंगिन्याने आम्ही आमच्या सर्व प्रतिपक्षांस खुंटवन गप्प बसवितो. संपूर्ण अर्थाचा विनिश्चय ज्याला करावयाचा आहे, त्याने स्थाद्वादाचा अंगीकार करावा, म्हणजे त्यास सर्वदा जयच मिळेल. अन्योन्यपक्ष प्रतिपक्षभावामुळे इतर मताभिमान्यांचे प्रवाद मत्सरमूलक असतात. आम्ही जैनमतानुयायी नि:पक्षपाती आहोत. * जिनदत्तसूरीनी जैनमातचे सार बारा श्लोकांत दिले. आहे. त्यापासून जिनमताची कल्पना थोडक्यांत बरीचशी येते. *अठरा दोष रहित, सम्यक् तत्त्वज्ञानाचा उपदेश करणारा असा गुरु तोच जिन देव होय. सम्यग्दर्शन सम्यग्ज्ञान आणि सम्यक्चारित्र ही तीन मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत. प्रत्यक्ष आणि अनुमान वगैरे ( परोक्ष ) ही देनच प्रमाणे जैनांस संमत आहेत. सर्व जगत् नित्यानित्यात्मक आहे. मूळतत्त्वे सात किंवा नऊ आहेत. सात तत्त्वे आहेत असे मानणारे लोक पापपुण्याचा अन्तर्भाव आस्रव व संवर ह्या तत्त्वांत करतात. आठ कर्माचा नाश होऊन -- *टपि--बल, भोग, उपभोग, दान, लाभ, निद्रा, भीति, अज्ञान, जुगुप्सा, हिंसा, रती अरती, राग, द्वेष, रति, अतिस्मर, शोक आणि मिथ्यात्व हे अठरा दोष होत. १ ज्ञानावाणी कर्म, २ दर्शनावाणी कर्म, ३ वेदनीकर्म, ४ मोहिनीकर्म, ५ नामकर्म, ६ गोत्रकर्म, ७ आयुष्यकर्भ आणि ८ अन्तरायकर्म.