पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ प्रस्थानभेक प्राप्त झाली असे समजावे. मिथ्यादर्शनादि कारणांचा निरोध, संचित कर्माचे निर्जरेनें निरसन, नवीन कर्माचा अभाव; ह्या सर्व गोष्टी साधून कमाचे आत्यान्तक मोक्षण झाले ह्मणजे मोक्ष मिळतो. कर्मापासून विप्रमोक्षण, हेच मोक्ष होय. अशी ही जैनांची सात मूलतत्त्वे आहेत. सुखदुःखांची पुण्य व पाप ही साधने आहेत, ती ह्या सात पदार्थात आणखी मिळविली, म्हणजे नऊ पदार्थ होतात. सर्व जैन मताभिमान्यांस स्याद्वादी म्हणतात. याचं कारण असे आहे की त्यांचा 'सप्तभंगिनय' नावाचा एक सुप्रसिद्ध न्याय आहे. आपल्या सर्व प्रतिवाद्यांशी वादकरतांना ह्या न्यायाचा ते नेहमी उपयोग करतात. हे त्यांचे मोठे शस्त्रच आहे. अनन्तवीर्यानी ह्या न्यायाचे प्रतिपादन केले आहे. एकाद्या वस्तुविषयी विधान करावयाचे असल्यास ' स्यादस्ति' ( कदाचित् आहे-असेल ) असे म्हणावें. निषेधाच्या वेळी 'स्यान्नास्ति' ( कदाचित् नसेल.) क्रमाने विधान व निषेध करावयाचा असल्यास ‘स्यादस्तिच नास्तिच' ( कदाचित् असेल-नसेल ). चवथा प्रकार " स्यादवक्तव्य" ( कदाचित् सांगता येत नाही). पांचवा कार ‘म्यादस्तीत्यवक्तव्यः, ( कदाचित् आहे हे सांगतां येत नाही ). सहावा प्रकार 'स्यान्नास्तीत्यवक्तव्यः' ( कदाचित् नाही हे सांगता येत नाही). आणि सातवा प्रकार ‘स्यादस्तिच नास्तिचावक्तव्यः' ( कदाचित् असेल किंवा नसेल हे सर्व अनिर्वचनीय, अवाच्य आहे. सांगतां - - -