पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"अहंदर्शन: स्थानी अनन्त पुद्गल (शरीर किंवा वस्तु) असतात. ह्या सर्व वस्तू आपल्या ठिकाणी रहातात, त्या प्रदेशबन्धामुळे तेथे रहातात. उमास्वाति (मि ? ) वाचकाचार्य आणि विद्यानन्द वगैरे जैन विद्वानांनी ह्या बन्धाचा सविस्तर विचार आपल्या ग्रन्यांत केलेला आहे. संवर ह्मणजे आस्त्रवाचा निरोध. पूर्वी केलेली व सध्यां होणारी कम आत्म्यांत प्रवेश करीत असतात. त्या कर्माचा आत्म्यास योग किंवा लेप होत असतो. ह्या योगाचा प्रतिषेध करणे हाच संवर होय. गुप्ति आणि समिति, असे संवराचे दोन भेद आहेत. काया, वाक्, आणि मन यांच्या निरोधाने कर्माच्या योगापासून आत्म्याचे रक्षण करणे, यास गुप्ति म्हणतात. परपीडेचे परिहाराने सदाचरण ठेवणे, ह्याला समिति म्हणतात. वाक्, मन आणि काया यांच्या प्रत्येकाच्या निरोधामुळे गुप्ति होईल ह्मणून गुप्ति तीन प्रकारची असते. तसेच समितीचे पांच प्रकार आहेत. ईष्या (ई) समिति, भाषासमिति, इषणासमिति, आदानसमिति आणि उत्सर्गसमिति. आचरणांत आपल्याकडून परपीडा न होईल अशा रीतीने वागणे, यासच समिति म्हणतात. संचित किंवा अर्जित कर्माचा तपादिक्रियांकरून नाश करणे, त्यांना जीर्ण करणे, यास निर्जरा हे नांव आहे. सर्व कषाय, पुण्य, सुख दुःखें यांचा सर्वस्वी नाश झाला पाहिजे. सारांश संसाराची बीजभूत जी सर्व कर्मे ती नाहीशी झाली पाहिजेत. अशी स्थिति प्राप्त झाली म्हणजे निर्जरा स्थिति