पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२. प्रस्थानभेद. हा शुभ कर्मयोग किंवा आस्रव आहे. शिव्या देणे, हा अशुभ आस्रव होय. योग शब्दाचा अर्थ जोडणे किंवा लेप असाच आहे. योगशास्त्रांतील अर्थ नव्हे. कांहीं जैन आत्रवाची निराळी व्याख्या देतात. इंद्रियांची प्रवृत्ति किंवा त्या प्रवृत्तीने आत्म्यास विषयांकडे जो ओढून नेतो, तो आस्रव अशी त्यांची व्याख्या आहे. बन्ध * मिथ्यादर्शन, अविरति, प्रमाद, आणि कषाय, यांच्यामुळे आणि वर सांगितलेल्या कर्मयोगामुळे आत्म्यास बन्ध उत्पन्न होतात. म्हणजे त्याला पुद्गल ( शरीर ) धारण करावे लागते. हे बन्ध चार प्रकारचे असतात; प्रकृतिबन्ध, स्थितिबन्ध, अनुभवबन्ध, आणि प्रदेशबन्ध, हे ते चार प्रकार होत. निंबाचा कडूपणा, गुळाचा गोडपणा, इत्यादि वस्तूंचे जे स्वाभाविक धर्म ते ह्या प्रकृतिबन्धापासून उत्पन्न झाले असतात. आज कोट्यानुकोटी ४ सागरोपमवर्षेपर्यंत गाईच्या दुधांत माधुर्य अबा. धित असें राहिले आहे; ही जी पदार्थांच्या गुणांची स्थिति ती स्थितिबन्धामुळे त्या त्या पदार्थात राहिली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये आपापले कार्य करण्याचे सामर्थ्य असते. हे सामर्थ त्या वस्तूंत असण्याचे कारण अनुभवबन्ध होय. अनन्त ___ * टोपः-१ मिथ्यादर्शन म्हणजे जैनमतांसंबन्धी अश्रद्ध २ अविरति विषयांपासून इंद्रिये परावृत्त न करणे. ३ आसक्ति प्रमाद, (आत्मरक्षण आणि सदाचरणाविषयीं चूक किंवा निःकाळ जीपणा) ४ कषाय-क्रोध, मान, माया, आणि लोभ, टीप:-- हैं एक कालमान आहे. पुढे पहा.