पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहंदर्शन. प्रमाणे कालाचा समावेश अस्तिकायांत होत नाही. तथापि जैनांच्या द्रव्याचे लक्षणाप्रमाणे काल हा एक द्रव्य आहे. 'गुणपर्यायवद्र्व्यम्' असें जैनांनी द्रव्याचे लक्षण दिले आहे. वैशेषिक सूत्रांत क्रियागुणवत्समवायिकारणम् द्रव्यम् ' असें द्रव्याचे लक्षण सांगितले, आहे (१११।१५) स्थलसको. चामुळे याचे अधिक विवेचन येथे करता येत नाही. याप्रमाणे वर सांगितलेले पांच अस्तिकाय आणि काल ही मिळून सहा द्रव्ये आहेत असें कांहीं जैनांचे मत आहे. सामान्यतः जिनमतांत सात किंवा नऊ मूळतत्त्वं आहेत, असें वर्णिले आहे. १ जीव, २ अजीव, ३ आस्रव, ४ बन्ध, ५ संवर, ६ निर्जरा आणि ७ मोक्ष. ह्या सातांत पाप व पुण्य ही येत नाहीत. पाप व पुण्य ही स्वतंत्र मूळतत्त्वे आहेत, असे काही लोक मानतात. पूर्वीची सात आणि ही दोन मिळून एकंदर नऊ तत्त्वे होतात. जीव व. अजीव ह्याविषयी वर थोडेसें निरूपण केलें आहे. काया, वाचा आणि मन ह्यांच्या कर्माचा योग जो आत्म्यास होत असतो, त्या कर्मयोगाला आस्रव असें म्हणतात. पाण्यात बुडालेल्या दारांतून पाण्याचा ओघ [स्रव] असा जोराने आंत शिरत असतो, तशीच आपली सर्व कर्मे आत्म्याकडे जोराने जाऊन त्यास लेप करतात. म्हणून या कर्मयोगास आस्रव म्हणतात. शुभ किंवा अशुभ कर्मानुरूप हा आस्रव शुभ किंवा अशुभ असतो. उदाहरणार्थ-अहिंसा