पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० प्रस्थानभेद. मुक्तच आहेत, असे समजावें. धर्म, अधर्म आणि आकाश हे तीन अस्तिकाय एकेकटेच आहेत. त्यांच्याकडून क्रिया होत नाही. ते निष्क्रीय आहेत. परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पदार्थ नेण्या आणण्यास ते तिन्ही साधनें आहेत. लोकाकाशांत जीवाला चोहोंकडे जाण्यास बसण्यास वगैरे क्रिया करण्यास प्रवृत्त करणारा जो, तो धर्म होय. हा प्रवृत्त्यनुमेय आहे. ह्याच्या उलट अधर्म, अधर्म स्थित्यनुमेय आहे. एक वस्तु ज्या स्थली आहे, त्या स्थलावर दुसऱ्या वस्तूचा प्रवेश करणे, तेथें त्या वस्तूला अवकाश देणे, हा आकाशाचा गुण (कृत्य) आहे. पुद्गल म्हणजे, शरीर किंवा विषय. जीवाव्यतिरिक्त असा स्थावराचा जो भाग, तोच पुद्गल असे समजावें. रूप, रस आणि स्पर्श हा तीन गुणांनी युक्त असा पुद्गल असतो. अणु आणि स्कन्ध ( समुदाय ) असे पुद्गलाचे दोन प्रकार असतात. अणूंचा उपभोग घेतां येत नाही. द्वयणुकादि स्कन्ध हे उपभोगाचे विषय होत. (द्वयणुकादि विषय हेच उपभोगाचे साधन आहेत, असे मुक्तावलीतहि सांगितले आहे. ) अणंच्या संघातापासून व्यणुकस्कंध निर्माण होतात. हे स्कन्ध कधी कधी संघाताने किंवा भेदानें उत्पन्न होतात. म्हणून त्यांस पुद्गल असें नांव दिले आहे. 'पूरयान्त गलन्तीति' भरतात आणि गळून जातात, असा पुद्गल शब्दाचा विग्रह केला आहे. असे हे पांच आस्तिकाय किंवा मूळ पदार्थ (तत्त्वे) कांहीं जैन मानतात. आस्तिकायाच्या लक्षणा