पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहहर्शन. धर्म, अधर्म आणि पुद्गळ अशी पांच तत्त्वे आहेत असे ते म्हणतात. ह्या पांच पदार्थांस · अस्तिकाय ' हे नांव त्यांनी दिले आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या तिन्ही काली हे पदार्थ असतात (अस्ति) म्हणून 'अस्ति,' आणि अनेक प्रदेशांत शरीर धारण करून ते रहातात म्हणून काय.' अशाकारणामुळे त्या पदार्थास 'अस्तिकाय? असे म्हणतात. जीव अनन्त आहेत. त्यांचे मुक्त आणि संसारी असे दोन भेद आहेत. जन्ममरणाच्या रहाटगाडग्यांत सांपडलेले जे जीव हे संसारी होत. संसारी जीवाचे समनस्क आणि अमनस्क असे दोन पोटभाग करतात. बोलणे चालणे, बोध, ग्रहण, इत्यादी अनेक क्रिया करणाऱ्या शक्तीला संज्ञा म्हणतात. समनस्क जीवांत ही शाक्त असते, म्हणून त्यांना संज्ञी म्हणतात. अमनस्क जीवांत ही संज्ञाशाक्त नसते. अमनस्क जीवांचे त्रस आणि स्थावर असे दोन भाग करतात. दोन तीन चार आणि पान अशी इंद्रिये असणारे निरनिराळे शंखगंडादिकासारखे प्राणी असतात. हा चार जातींच्या प्राण्यांचा अन्तर्भाव त्रसभागांत होतो. त्रसभाग हा चतुर्विध आहे. पृथिवी आप, तेज, वायु आणि वनस्पती (वृक्षादि), यांचा समावेश स्थावर भागांत होतो. हा पांचहि स्थावर पदार्थात जीव असतो. त्या त्या पदार्थाच्या केलेल्या कायांत ते जीव रहातात. ह्या स्थावर पदार्थाना एक स्पर्शेन्द्रिय कायतें असतें. ह्यामुळे दुसरा जन्म त्यांना घेता येत नाही. म्हणून त्या स्थावरांतील जीव