पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रेस्थान द. वर्णिले आहेत. ते असेः-१ औपशमिक भाव, २ क्षायिक भाव, ३ मिश्र भाव, ४ औदायिक भाव आणि ५ पारिणामिक भाव. पूर्वकर्माचा उपशम होऊन, कर्माचें फल पुढे भोगावयास काही वेळ तरी लागत नाही, अशा अवस्थेस औपशमिक भाव म्हणतात. कर्माचा अत्यन्त नाश होऊन मोक्षपदाची योग्यता ज्या अवस्थेत येते, तिला क्षायिक भाव म्हणतात. हे दोन्ही भाव जेव्हां मिश्र असतात, तेव्हां तो मिश्रभाव होय. ज्या अवस्थेत कर्माची फलें भोगावी लागतात, कर्माचा पगडा जोवावर बसला असतो, म्हणजे कर्माचा उदय झाला असता, अशा अवस्थेस औदायिक भाव म्हणतात. सहज, चैतन्यात्मक, आणि वर सांगितलेल्या चार भावांची काही एक अपेक्षा न धरणारा असा जो जीवाचा भाव त्याला पारिणामिकभाव म्हणतात. जीवात्मा बद्ध नसून त्याला मी बद्ध आहे, असे वाटत असते, असे सांख्य दर्शनांत सांगितले आहे. त्या अबद्ध जीवात्म्याच्या स्थितीसारखाच हा पारिणामिकभाव असावा. याप्रमाणे जीव हा या पांच अवस्थापैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतो. स्वरूपसंबोधन ग्रन्थांत आत्म्याचे स्वरूप येणेप्रमाणे सांगितले आहे. ज्ञानाद्भिन्नो ननाभिन्नो भिन्नाभिन्नः कथंचन ॥ ज्ञानं पूर्वापरीभूतं सोऽयमात्मेति कीर्तितः ॥ जीव आणि अजीव या दोन मुख्य तत्त्वांची मांडणी कांहीं जैनमती निराळया रीतीने करतात, जीव, आकाश,