पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहंद्दर्शन. सम्यक्चारित्र म्हणतात. ह्या सदाचरणाचे पांच प्रकार आहेत. अहिंसा, सुनत, ( सत्य ), अस्तेय, ब्रह्मचर्य, आणि अपरिअह, हे ते पांच प्रकार होत. ह्या पांच व्रतांचे पालन यथायोग्य रीतीने झाले पाहिजे. अहिंसा शब्दाचा अर्थ स्पष्टच आहे. कोणत्याहि स्थावर किंवा जंगम पदार्थाची हानि न करणे. आपल्याला जें दिले नाही, ते न घेणे, याचें नांव अस्तेय. ब्रह्मचर्य सर्वांस माहीत आहेच. अपरिग्रह म्हणजे सर्ववस्तूच्या संबन्धाने इच्छा न धरता त्यांचा त्याग करणे. अशा ह्या पांच महाव्रतांचे आचरण केले अ. सतां मोक्ष प्राप्त होतो. हे ऋणत्रय मोक्षसाधनाचा मार्ग आहे, ही गोष्ट वर एकदा सांगितली आहेच. . जैनमतांत दोनच मुख्य तत्त्वे आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु काही जैन ही मुख्य तत्त्वे पांच (सहा) सात किंवा नऊ आहेत असे मानतात. जीव आणि अजीव अशी दोन तत्त्वे आहेत. बोधात्मक किंवा चैतन्यात्मक जोपदार्थ त्याला जीव म्हणतात. अचित् किंवा जड पदार्थास अजीव म्हणतात. ह्या दोहोंतील उपादेय ( ग्राह्य ) कोणतें, व हेय ( त्याज्य ) कोणते, त्याचा विचाराने निर्णय करणे, याला विवेक, असें नांव आहे. कर्त्याचे रागादि दोष, त्यापासन होणारी कर्मे ही सर्व हेय होत. परंज्योति हेच उपादेय आहे. ह्याला ' उपयोग ' असें नांव आहे. सहज, चिद्रप, व त्याची परिणति, यांचे पूर्णज्ञान होणे, याला उपयोग म्हणतात. वाचकाचार्यानी जीवसत्त्वाच्या पांच अवस्था किंवा भाग