पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. सूक्तं यांत आहेत. पूर्वीच्या मंडलांत येणाऱ्या विषयांपेक्षा निराळे विषय आले आहेत. रुद्र, अग्नि . आणि विशेषतः विश्वेदेव, मन्यु, श्रद्धा इत्यादि देवतांचे वर्णन यांत आहे. शिवाय विवाह, और्ध्वदेहिक कर्म, सृष्टीची उत्पत्ति, तत्त्वशास्त्र आणि मोहनी वगैरेचे मंत्र इ० नवीन विषय या मंडलांत आले आहेत. अनेक देवता आहेत, ही कल्पना कमी कमी होत जाऊन एकच देव आहे ही भावना समाजांत जागृत झालेली असावी, असें या मंडलांत दिसते. . ऋग्वेद हा हौत्रवेद असल्यामुळे होतृऋत्विजाने म्हणावयाचे मंत्र यांत.आले आहेत. देवतांची स्तुति व त्यांची प्रार्थना हे दोन त्यांतील मुख्य विषय होत. अनेक देवतांचे पराक्रम, त्यांचे माहात्म्य, वैभव, तेजस्वीपणा, औदार्य, शहाणपण इत्यादि गुणांचे वर्णन यांत आलेले आहे. तसेंच आमांस गोधन द्या, संतति द्या, आमची भरभराट होऊ द्या, युद्धांत आमांस जय मिळो, आमच्या शत्रूचे निसंतान होवो. आमचे वैभव वाढो, आणि आमीं दीर्घायु होवो ! अशा प्रकारच्या प्रार्थना या वेदांत आल्या आहेत. ऋग्वेदांत ३३ देवांचे वर्णन आलेले आहे. परंतु फक्त सुमारे २० देवांचे वर्णन तीन किंवा तीनहून अधिक सूक्तांत झालेले आढळतें. पर्जन्य, वात आणि यम यांची प्रत्येकाची तीनच सूक्तं आहेत. इंद्राची सूक्ते २५० आहेत. अग्नि व सोम यांची सूक्ते अनुक्रमें सुमारे २०० व शंभर आहेत. इंद्र, अमि (मित्र व मातरिश्वन् ) सोम,