पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ प्रस्थानभेद. स्वभाव व त्या स्वभावनुरूप त्यांची व्यवथा, ह्याविषयी कोणत्याहि प्रकारचा मोह किंवा शंका न रहातां जें मनुप्यांस ज्ञान होते, त्या ज्ञानाला 'सम्यग्ज्ञान ' म्हणतात. यथावस्थिततत्त्वांच्या ज्ञानालाच सम्यग्ज्ञान म्हणतात. १ मति, २ श्रुत, ३ अवधि, ४ मनःपर्याय, आणि ५ केवल असे ज्ञानाचे पांच भेद आहेत. आवरण किंवा ज्ञानप्रतिबन्धक वस्तूंचा क्षय होऊन इंद्रिय व मन यांच्या व्यापाराने यथार्थाचे मनन में करते ती मति होय. मतीपासून उत्पन्न झालेले स्पष्ट असें जें ज्ञान त्याला श्रुत किंवा श्रुति म्हणतात. आवरणाचा क्षयोपशम करणारे, ज्याचा विषय अवच्छिन्न ( मर्यादित ) झाला आहे, अशा ज्ञानास अवधि । हें नांव आहे. दुसऱ्याच्या मनांतील अर्थास स्फुट आणि स्पष्ट करून दाखविणारे असें जें ज्ञान त्याला मनःपर्याय म्हणतात. तप आणि अशाच विशिष्टक्रिया, जें ज्ञान मिळावे म्हणून तपस्वी करतात, त्या ज्ञानाला केवलज्ञान म्हणतात. हे केवल ज्ञान अन्यज्ञानांशी संस्पृष्ट नसते. ते अगदी वेगळे असते. असे हे ज्ञानाचे पांच भेद जैनांनी मानिले आहेत. हे ज्ञान प्रत्यक्ष किंवा परोक्ष असते. प्रत्यक्ष किंवा अनुमान ह्या दोन प्रमाणांनी ते प्राप्त होते. ___ संसाराचा त्याग करण्यासप्रवृत्त झालेल्या श्रद्धालु आणि ज्ञानवान् , अशा पुरुषाने सदाचरणाने वागलं पाहिजे. पापजनक क्रियांची निवृत्ति करणे, किंवा सर्व निंद्ययोगांचा त्याग करणे, याला सदाचरण किंवा