पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहंदर्शन. म्हणन सर्व वरतंचें ज्ञान करून घेण्याची शाक्त आत्म्याच्या अंगी स्वभावतः असते, हे कबूल केले पाहिजे. अशा रीतीने जैनमतानुयायी सर्वज्ञता सिद्ध करतात. ही सर्वज्ञता ज्यांनी संपादन केली आहे असे अनेक सर्वज्ञ पुरुष ह्या जगांत आजपर्यंत निर्माण झाले आहेत. त्यांनी आपल्या तत्त्वार्थाचा बोध लोकांस केला आहे, हे तत्त्वार्थकथन त्यांचे आगम होत. ह्या पूर्वांच्या आगमापासून तत्त्वज्ञान संपादन करून पुढे दुसरे सर्वज्ञ पुरुष निर्माण होतात. हे सर्वज्ञ पुरुष आपापले आगम प्रतिपादन करतात. अशा परंपरेनें आगम आणि सर्वज्ञ यांचा प्रसार ह्या जगांत . बीजांकुरन्यायाने होत असतो. हा सर्वज्ञ पुरुष यथार्थवादी, जितरागादिदोष. त्रैलोक्यमान्य असा असतो, तोच परमेश्वर अर्हत् समजावा, सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, आणि सम्यक् चरित्र (आचरण) ही तीन मोक्षाचे मार्ग आहेत. ही जैनांची तीन रत्नें होत. ह्या रत्नत्रितयाचें यथान्याय संपादन केले पाहिजे. यापैकी एकाचेच साधन करून आपला कार्यभाग घडून येणार नाही. ह्या तिन्हींच्या प्रभावाने मोक्ष मिळतो. जिनांनी प्रतिपादन केलेल्या तत्त्वार्थाविषयी विपरीत मत नसून त्या तत्त्वावर केवळ श्रद्धा ठेवणे, (श्रद्धान ) ह्यालाच सम्यग्दर्शन म्हणतात. त्या तत्त्वार्थाविषयी अभिरुचि मनुष्याच्या अन्तःकरणांत निसर्गत:च उत्पन्न होते, किंवा गुरूच्या अधिगमाने ( व्याख्यानादि उपदेशाने ) उत्पन्न होते, जीवादि जे पदार्थ किंवा तत्त्वे ह्या जगांत आहेत, त्यांचा