पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ - - प्रस्थानभेद. णारा आहे. तो नसूनहि त्याची क्रिया भ्रांतीमुळे घडली. म्हणून अर्थक्रियाकारित्व असें सत्वाचे लक्षण करणे ठीक नाही. उत्पत्ति, स्थिति (स्थायीपणा ) आणि लय ह्या तीन अवस्थांनी युक्त असा जो पदार्थ त्याला सत्व म्हणावें, असें जैनांनी सत्वाचे लक्षण दिले आहे. समानसंतानंवर्तित्व हे मत, (आंब्याच्या कोयीला मधांत भिजविली असतां त्या कोयीपासून होणा-या आंब्याचे झाडाला मधासारखी गोड फळे येतात, तसेच सरक्या रंगांत भिजवून पेरल्या तर त्यांच्या कापशीला त्या रंगाचा कापूस येतो,)ही त्या समान संतानवर्तित्व मतांस पोषक उदाहरणे,ज्ञान साकार असते, इत्यादि बौद्धांची मते जैनांनी आपल्या युक्तिवादाने खोडून टाकिली आहेत. सारांश, क्षणिक वादासंबंधानें सिद्धसेन वाक्यकार असें म्हणतात की, हा वाद मान्य केला, तर केलेल्या कर्माचे फलाचा नाश होईल, न केलेल्या कर्माचे फल उपाभेगास प्राप्त होईल. हा संसार ( भव ) चालणार नाही, आणि स्मृति ( स्मरणशाक्त ) हिचा नाश होईल. असे मोठे दोष यापासून निष्पन्न होतील. ही गोष्ट न जुमानतां कोणी क्षणिक वादाचा अंगीकार करील तर तो साहसिकच म्हणावा. ___ एतावता पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी बौद्धमार्गाचा अंगीकार न करतां अर्हताचा मार्ग स्वीकारावा असें जैनांचे मत आहे. अर्हत् कोणास म्हणावें ? अर्हत् या पदाला कोण योग्य आहे ? त्याचे लक्षण काय ? हे अर्हत्स्वरूप आप्तनिश्चयालंकार ग्रंथांत