पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३१ अर्हहर्शन. अहंदर्शन. चार्वाकमत, आणि बौद्धमतांतील चार प्रस्थानभेद, असे मिळून पांच प्रस्थाने झाली. सहावें अर्हद्दर्शन होय. अर्हत् हे जिनांचंच नाव आहे. जैन आणि बौद्ध मतांत व धर्मात फार फरक नाही. जिन आणि बुद्ध हे समकालीन होते. जिन हे बुद्धाचेंहि नांव होते. स्वर्ग आणि मोक्ष ह्या दोन अवस्था किंवा स्थिति जैनांस मान्य आहेत. बौद्धांचा क्षणिकवाद जैनांस कबूल नाही. सर्व सत्त्वे ( पदार्थ ) क्षाणक आहेत, असें मानिले तर आत्मा हा क्षणिक होणार. तो स्थायी नसला तर, कर्म एकाने करावे आणि त्या कर्माचें फल दुसऱ्याने भोगावे, असें होईल. अशारीतीनें लौकिक कर्मे करून त्यांचे फल संपादन करणे हे विफल होईल. आपल्या कर्माचे फल आपल्यास मिळणार नाही असें जर झाले तर फल मिळविण्याची खटपट कोण करील? कोणीहि करणार नाही. अनुमानानें क्षणिकत्व स्थापन होतें असें बौद्धांचे झणणे आहे; त्यांवर जैन म्हणतात की बौद्धांचें अनुमान होतच नाही, कारण त्यानी सांगितलेला व्याप्तीचा दृष्टांत हा दृष्टांत होत नाही. सत्वाची व्याख्या बौद्धांनी दिली आहे ती अशी:-सत्व म्हणजे अर्थक्रियाकारी पदार्थ. ही व्याख्या जैनांस कबूल नाही. कारण तें लक्षण धरून चाललें तर साप डसला नसून साप डसला अशी भ्रान्ति झाल्या. बरोबर भीति उत्पन्न होते. साप हा भीतिरूपी अर्थक्रिया कर