पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अहहर्शन. २३३ चन्द्रसुरीनी ( हेमचन्द्रसुरींनी ) वर्णिले आहे. ते स्वरूप असे: सर्वज्ञो जितरागादिदोषस्त्रैलोक्यपूजितः ॥ यथास्थितार्थवादीचदेवोऽहन्परमेश्वरः ।। सर्वज्ञ, रागद्वेषादि मनोविकार (ड्रिपु ) ज्याने जिंकिले आहेत, सत्य बोलणारा, त्रैलोक्यास मान्य, परमेश्वर हाच अर्हन् होय. चार्वाकपंथी तौतातिक आणि कुमारिलभट्ट, यांचा या मतावर असा आक्षेप आहे की, सर्वज्ञ असा पुरुष या जगांत असणे अगदी अशक्यच आहे. प्रमाणपंचकांपैकी कोणत्याहि एका प्रमाणाने अशा पुरुषांचे अस्तित्व सिद्ध होत नाही. सर्वज्ञ असा पुरुष आपल्यास दिसत नाहीं, म्हणून त्याविषयी प्रत्यक्ष प्रमाण नाही. हेतु सांपडून व्याप्ति सिद्ध होत नाही, म्हणून अनुमान करता येत नाही. वेदादिकासारखी आप्तवाक्ये नाहीत, म्हणून शब्दप्रमाण धरतां येत नाही. सादृश्यच मिळत नाही, म्हणून उपमानाने सर्वज्ञता सिद्ध करतां येत नाही. अर्थापत्तीने अर्हताची सर्वज्ञता आपण सिद्ध करूं लागलों तर त्याच न्यायाने बुद्धहि सिद्ध होईल. मग बुद्ध जसा तसाच अर्हन् . याच्यांत विशेष कांहींच रहाणार नाही. ___ यावर जैनांचे असे उत्तर आहे की, अनुमान प्रमाणाने सर्वज्ञता सिद्ध होते, आणि पंचावयवी वाक्याने ही गोष्ट ते सिद्ध करून दाखवितात.