पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० प्रस्थानभेद. एकठिकाणी राहणाऱ्या भिक्षुगणांस संत्र म्हणतात. बौद्ध धर्माचा सारांश पालीभाषेत लिहिलेल्या धम्मपद (धर्मपद ) नांवाचे ग्रन्थांत एका श्लोकांत दिला आहे तो असाः सब्ब पापन्स अकरणं कुससस्स उपसंपदा ॥ सचित्तपरियोदपनं एतं बुखान सासनं ।। सर्वपापस्याकरणं कुशलम्योपसंपदा॥ स्वचित्तस्यदमनमेतद्वृद्धस्य शासनम् ।। बौद्धधर्माचे दोन पंथ फार प्राचीन कालींच झाले, ही गोष्ट वर नमूद केली आहे. उत्तरेकडील पंथांत (तिवेट, काशमीर चीन बंगरे देशांत ) कालगतीने धार्मिक कर्माच्या बाबींत थोडेबहु न फेरफार झाले. परंतु बुद्धाची मूळतत्त्वे काम ठेवून त्यांच्या आधारानेच हे फेरफार करण्यांत आले. ह्या पंथाला 'महायान' हे नांव आहे. ह्या नवीन धर्मात मैत्रेय, ध्यानीवुद्ध, मंजुश्री, आणि अवलोकितेश्वर, या चौघा महात्म्यांची पूजा करावी असे सांगितले आहे. भूतदया-करुणा किंवा प्रेम, चिंतन किंवा ध्यान, अन्तःकरणाची शुद्धि आणि प्रज्ञा ( शाहाणपण ) या चार गुणांचे ते महात्मे अवतारच आहेत, असे त्या देशांतील बौद्ध लोक मानतात.दक्षिणेकडील पंथास हीनयान' असें नांव आहे. ह्या पंथाचे धर्मनियम अशोकाच्यावेळी ठरण्यात आले. त्यावेळेपासून मांत फेरबदल झाला आहे, असें ऐकण्यांत नाही. लंका, असाम, ब्रह्मदेश वगरे देशांत हा धर्म चालू आहे.