पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन, २२९ व निंदा, लाभालाभ, आणि जयाजय ह्या चार द्वन्द्वांस लोक धम्म-लोकस्वभाव असें म्हणतात ). (११) एतादृश ( अशी वर सांगितलेली ) कर्मे करणारे लोक सर्वत्र विजयी होतात, सर्वत्र त्यांना स्वास्त ( सुख ) प्राप्त होते, हेंच - त्यांचे आचरण त्यांचे उत्तम मंगल होय. ( १२) गृहस्थाश्रमांत राहाणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या आचरणांचे विधिनिषेध नियय ह्याप्रमाणे बुद्धांनी सांगितले आहेत. वर दिलेल्या दिग्दर्शनावरून बौद्ध धर्माविषयी थोडीबहुत कल्पना आल्यावांचून राहणार नाही. गृहस्थाश्रमांतील धर्माप्रमाणे दुसऱ्या आश्रमाचे धर्म त्या त्या आश्रमांना अनुरूप असे सांगितले आहेत. १ बुद्ध, २ धर्म, आणि ३ संघ, अशी ही तीन रत्ने आहेत, असें बौद्ध मानतात. मा तीन रत्नांचा सविस्तर इतिहास येथे देणे शक्य नाही. भगवान् बुद्धांचा जन्म राजकुलांत झाला. ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेण्याचे सामर्थ्य व संधी असतांहि त्यांस विरक्त उत्पन्न झाली आणि दुःखाचा संहार होऊन शाश्वत सुख कसे मिळेल ह्याविषयी चिंतन करण्यास ते वनांत गेले. अनेकवर्षे चिंतन केल्यानंतर मनाची खात्री करून घेऊन आपल्या मताचें प्रतिपादन करण्यास बुद्धांनी आरंभ केला. ही हकीकत वर एकदा सांगितलीच आहे. बुद्धास अशारीतीने देवपण मिळाले. त्याच कालान्तराने पुष्कळ शिष्य झाले. हे शिष्य भिक्षुवत्तिधारण करून वनांत चिंतन व धर्मसंचय करीत असत. आणि देशोदेशी जाऊन आपल्या धर्माचा उपदेश करीत. - -