पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ प्रस्थानभेद. वर दिलेल्या पालीभाषेतील ह्या पद्यांचा अर्थ असा आहे. (१) मूर्खाची सेवा किंवा संगति करूं नये. शाहाण्याची संगति किंवा सेवा करावी. पूज्य जे आहेत त्यांची पूजा करावी, ( माननीयास मान द्यावा ) हेच उत्तम मंगल होय. (२) योग्य देशांत वास, पदरीं पुण्यांचा सांठा, सन्मार्गी मन-हेच उत्तम मंगल. (३) बहुशास्त्र किंवा विद्या, शिल्पज्ञान, सुशिक्षित विनय, किंवा तद्वर्तनाची संवय, सुभाषित वाणी ( समयोचित भाषण ) हेंच उत्तम मंगल (४) आईबापांची सेवा, भाक्त, बायकामुलांचे संगोपन, व्यवस्थितपणे कामें करणें-हेच उत्तम मंगल.( ५ ) दान, धर्माचरण, ज्ञातीचे संगोपन ( संग्रह ), अनवद्य म्हणजे प्रशस्त अशी कर्मे करणें-हेच उत्तम मंगल. (६) पापाला कंटाळून पापकर्मापासून दूर असणे, विरत असणे, मद्यपानाचे कामी मनाचे सयमन, धर्माचरणीं दक्षता, ( अप्रमाद )-हेच उत्तम मंगल, (७) सत्पुरुषांचा गौरव, नम्रतेने वर्तन, कृतज्ञता, यथाकाली धर्मश्रवण-हेच उत्तम मंगल (८) क्षांति, गोड भाषण, श्रमणांचं दर्शन ( भेटी घेणे), यथाकाली धार्मिक विषयांवर संभाषण हेच उत्तम मंगल. (९) तपश्चर्या, ब्रह्मचर्य, आर्यसत्वांचे ( वर सांगितलेले तत्त्वचतुष्टयांचे ) दर्शन, ज्ञान निवार्णाचा साक्षात्कार करून घेणे-हेच उत्तम मंगल. (१०) लोकस्वभावांशी संबन्ध झाला असतां ज्याचें चित्त कांपत नाहीं, शोकरहित, निर्मळ, आणि क्षेम असतें अशारीतीने वागणें-हेच उत्तम मंगल, (सुख व दुःख, स्तुति