पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद. १,५३,८२६ आणि पदें (अक्षरें) ४,३२, ००० आहेत. गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भरद्वाज आणि वसिष्ठ हे अनुक्रमें २ ते ७ मंडलांचे ऋषि आहेत. या ऋषींना • माध्यम ' म्हणतात. त्यांच्या मंडलात विशेष रचनापद्धति दिसून येते. स्वतःचे गोत्राकरितांच त्या ऋषींनी आपापले मंत्र निरनिराळे केले असावेत. यज्ञांत पशु आणण्याचे पूर्वी — आश्री' नांवाचे मंत्र म्हणावयाचे असतात, ते प्रत्येक ऋषीचे वेगळे वेगळे आहेत. हेच मंत्र त्यांनी म्हणावेत, दुसऱ्या ऋषींचे मंत्र म्हणू नयेत असे ऐतरेय ब्राह्मणांत (२-४ ) सांगितले आहे. या मंडलांत पहिल्यांदा अमीविषयी व नन्तर इंद्रादिकांच्या ऋचा येतात. ह्या व इतर कारणावरून ही मंडलें अगोदर रचली असावीत, असा अदमास आहे. या मंडलानंतर, पहिलें, आठवें, व नववें ही मंडलें झाली असावीत. पहिल्या मंडलांत अनेक ऋषींची सूक्ते आहेत. त्यांत कण्व व कण्वगोत्रज ऋषींची सूक्ते बरीच आहेत. या ऋषींस शतर्ची म्हणतात. कारण प्रत्येकाने शंभर शंभर ऋचा केल्या आहेत. आठव्या मंडलांत प्रगाथा आहेत. यांतहि कण्वऋषींची सूक्तं बरीच आहेत. या सुक्तांत आणि पहिल्या मंडलांतील कण्वांचे सूक्तांत बरेच साम्य आहे. नववें मंडल, पहिली आठ झाल्यावर झाले असावे. यांत फक्त पवमानसोमाचे वर्णन आहे. वर सांगितलेल्या ऋषींनी केलेली पवमानसूक्तं यांत ग्रथित केली आहेत. दहावें मंडल शेवटीं झालें. क्षुद्रसूक्ते व महा