पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ प्रस्थानभेद. पणा ( अश्रद्धा ), ही तीन मनाची पापें होत. याप्रमाणे ह्या दहा कायिक, वाचिक आणि मानसिक पापांचा निषेध केला आहे. पालीभाषेत यांस " दस अकुसल कम्मपथ " (दश अकुशल कर्मपथ ) असे म्हणतात. विहित आचरणाचेहि अनेक नियम सांगितले आहेत. त्या सर्वांचे सार वर सांगितलेल्या खुडुक पांत आणि मंगलसुत्तांत वर्णिलेल्या बुद्धांच्या उत्तरांत आले आहे. तेवढे सार समजलें म्हणजे वुद्धानी सांगितलेल्या आचरणनियमांची चांगली कल्पना येईल. प्रोफेसर धर्मानन्द कोसंबींच्या व्याख्यानांतून पुढील बारा श्लोक उतरूत घेतले आहेत, त्यांवरून भगवान् बुद्ध कशास मंगळ मानतात म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे कोण कोणतें आचरण चांगले आहे,हे स्पष्ट कळून येईल. चाईल्डर्स साहेबांनी ह्या पद्यांचे इंग्रजीत भाषांतर फार सुंदर केले आहे. ( See gournal of the Royal Asiatic Society New Series Vol IV Part II.) कोणी एक देवता बुद्धास म्हणाली. बहू देवा मनुम्सा च मंगलानि अचिंतयुं ॥ आकंखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं ॥ १ ॥ बहुदेवा मनुष्याश्च मंगलान्यचिंतयन् ॥ आकांक्षमाणा समुत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमम् ॥ २ ॥ (संस्कृत) पुष्कळ देवांनी आणि मनुष्यांनी आपली सुखवृद्धि व्हावी म्हणून चिंतन केलें, उत्तम मंगल कोणते ते सांगा.