पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. २२५ ठेवावी. खडकपथ या नांवाचा पालीभाषेत बौद्धधर्माचा एक ग्रंथ आहे. ह्या जगांत संसारी किंवा गृहस्थ लोकांस मंगल कोणतें ह्याविषयी बुद्धास प्रश्न केल्यावरून त्यांनी दिलेली उत्तरे ह्या ग्रंथांत दिली आहेत. मंगलसुत्तांत ही. मंगलें सांगितली आहेत. जन्मतः जातिभेद आहे, असें बौद्धधर्मात मानिले नाही. क्रियेवरून मनुष्य, ब्राह्मण किंवा वसल ( वृषल ) होतो. तथापि त्या धर्मात चार आश्रम आहेत. गृहस्थ उपासक श्रमणरि आणि भिक्षु, असे हे चार आश्रम आहेत. पुरुषांप्रमाणे स्त्रियांसहि ह्या चारहि आश्रमांत प्रवेश करता येतो. स्त्रियांना चारीहि आश्रमांचा अधिकार आहे. गृहिणी आणि गृहस्थ ( सर्व संसारी लोक) यांच्या आचरणाविषयी (शीलाविषयीं ) बुद्धांनी जे धर्मनियम घालून दिले आहेत, त्यांचे दोन भाग करता येतील. विधिनियम आणि निषेधनियम. यांला पालीग्रन्थांत चारित्तसील (विहितशील ) आणि वारित्तशाल ( निवारित-निषिद्धशील ) अशी नावे आहेत. वर सांगितलेली दहा पापें वारित्तसीलांत म्हणजे निषिद्ध आचरणाचे वर्गात येतात. त्यापैकी हिंसा, अदत्तादान (स्तेय, चोरी ) आणि व्यभिचार ही तीन कायिक पापें होत. खोटे बोलणे ( अनृत), चहाडी ( पैशून्य ), कठोर बोलणे ( पारुप्य ), आणि व्यर्थ बडबड ( प्रजल्पन असंबद्ध प्रलाप ), ही चार वाचाकृत पापं आहेत. लोभ (परद्रव्यादिकांचे अभिध्यान-घेण्याची इच्छा ), क्रोध आणि नास्तिक