पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ प्रस्थानभेद. झाला आहे. आपण बुद्धधर्मी नसूनहि, बुद्धधर्माप्रमाणे वागणे यथाशास्त्र व उचित आहे, असे आपल्या पूर्वजास वाट लागले आणि कालान्तराने बुद्ध हा विष्णूचा अवतारच बनून राहिला. गौतमबुद्ध हाच विष्णूचा अवतार असें विधान केले असतां पुष्कळ लोकांच्या दृष्टीने तें असमंजसपणाचें होईल असे दिसत नाही. संसारी लोकांस मार्गदर्शक असे बुद्ध धर्मशास्त्राचे अनेक ग्रन्थ पालीभाषेत आहेत. संसान्यांना दहा आदेश किंवा धर्मबंधने सांगितली आहेत. त्यांपैकी पहिल्या पांचांचें पालन, कांहीं होवो, झालेच पाहिजे. १ हिंसा, २ स्तेय३ व्यभिचार, ४ अनृत, ५ पैशून्य, ६ पारुप्य, ७ प्रजल्पन, ८ लोभ ९ क्रोध आणि १० अश्रद्धा, किंवा नास्तिकपणा ह्या दहा पापांचा अगदी निषेध केला आहे. कोणाचेहि हातून असली कृत्ये होऊ नयेत. भगवद्गीता, मनु, याज्ञवल्क्यादिकांनी असेच धर्म सांगितले आहेत. शुद्ध अन्तःकरण असल्यावांचून शुद्ध आचरण होत नाही. यासाठी पहिल्यांदा मन प्रबुद्ध करावें, आणि तंहांचा (तृष्णांचा) नाश करून टाकावा. द्वेषादि वाईट मनोविकार काढून टाकावेत. शुद्ध भाव, न्यायबुद्धि, श्रद्धा आणि ह्या सर्वांचा शिरोमणि जी भूतदया, त्यांचा अंगीकार करावा. मनोनिग्रह आणि भूतदया, ही दोन आचारांतील प्रधान कर्तव्ये आहेत. अशा रीतीने वागून संसारी लोकांनी धर्मसंचय करावा आणि निर्वाण मार्गाकडे जाण्याची प्रवृत्ति नेहमी