पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन, २२३ मुदिताभावना, अशुभाभावना, आणि उपेक्षाभावना, असे चिंतनाचे पांच प्रकार असतात. श्रमणक (भिक्षु)-वृत्ति धारण करावी, आणि अशा मार्गाने ह्याच जन्मी निर्वाण प्राप्त करून घेण्याची खटपट करावी. असा भगवान् बुद्धानी बोध केला आहे. भिक्षुवृत्ति धारण केली असतां मनुष्याने शिर मुंडून टाकावें, चीरवस्त्र धारण करावें, जवळ एक कमण्डलु आणि कातडे, ही असावीत, कषाय किंवा रक्त रंगाचे वस्त्र असावें, पूर्वाह्नांत (दोनप्रहरांचे आंत ) भोजन करावे, आणि संघाचा आश्रय करून रहावें. बौद्ध संघांच्यासाठी पूर्वी फार मोठमोठाली अशी एकांतवासांत बांधलेली विहारे आजून कायम आहेत. त्या विहारांत राहून बौद्ध भिक्षु चिंतन करीत असत. वेरूळ, घारापुरी, कारले भाजें वगैरे ठिकाणची लेणी पुष्कळांनी पाहिली असतील. ती पांडवलेणी बौद्धांची विहारें होती. - प्राणीमात्रांस पुनर्जन्म आहे. ह्या फेयांतून क्वचित् एकादा मनुष्य सुटून निर्वाणाप्रत जातो, असें बौद्धांचे मत आहे. एकाच जन्मांत सर्व वासनादिकांचा पूर्ण उच्छेद होऊन निर्वाणाची योग्यता येणे शक्य नाही. शिवाय सर्व मनुष्य संसार सोडून ह्याच कामाकडे लागतील,असा संभवहि नाही. अशा स्थितीत संसारांत राहूनहि मनुष्याने कसे आचरण केले असतां तो निर्वाणमार्गाकडे येईल, अशाबद्दल गौतमबुद्धांनी संसारी जनाकरतां धर्म सांगून ठेविले आहेत. ह्या धर्मशास्त्राचाच आपल्या आचरणावर फार मोठा परिणाम