________________
- २२२ प्रस्थानभेद. मोक्ष ह्मणतात. शिष्यांच्या ग्रहणशक्तीच्या मानाप्रमाणे बौद्ध मताचे चार निराळे वर्ग झाले आहेत आणि प्रत्येक निराळ्या वर्गाच्या बौद्धाचे प्रस्थानहि निराळे असते. अशारीतीनें बौद्धमताची चार दर्शने झाली आहेत. ही गोष्ट वर एकदा सांगितली आहेच. त्यांच्या मतांतील भेद पुनः एकदा येथे सांगितला असता, त्यांची कल्पना बरोबर लक्षांत येईल. वैभाषिक मताचे बौद्ध, अर्थ ज्ञानान्वित आहे, बाह्य विषय हा आपल्यास प्रत्यक्ष प्रमाणाने समजतो, असें म्हणतात. सौत्रान्तिक हे लोक बाह्य विषय अनुमानप्रमाणावरून समजतो, असे प्रतिपादन करतात. योगाचार किंवा विज्ञानवादीबौद्ध, बाह्य पदार्थ नाहीच, आपल्या ज्ञानांत बाह्य विषयांचे किंवा पदार्थाचे आकार उत्पन्न होतात आणि त्यामुळे बाह्य विषयांचे ज्ञान होते, असे ते मानतात. माध्यमिकांच्या मताप्रमाणे केवळ शुद्ध स्वस्थ असें ज्ञान (संविद् ) मात्र आहे, बाकी काही एक नाही. ह्या चार बौद्ध पंथाच्या मतांत अशा प्रकारचा भेद आहे. चौघांच्याहि मतांत मुक्तीचे स्वरूप आणि मार्ग एकसारखीच वर्णिली आहेत. राग द्वेष इत्यादि मनोविकार, ज्ञान, संतानवासना, ह्या सर्वांचा उच्छेद करून टाकावा. ती सर्व नाहीशी झाली पाहिजेत. असें झालें ह्मणजे त्यापासून मुक्ति प्राप्त होते. हेच बौद्धांचे निर्वाण होय. सर्वसंगपरित्याग करून वनांत जाऊन रहावे. चित्तवृत्तीचा निरोध शमदमादिकांनी करावा. भावनाचतुष्टयाचे मार्गानें चिंतन करावं. मैत्रीभावना, करुणाभावना