पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. कोणाचीहि पूजा केली तर त्यापासून काहीएक उपयोग नाही, असें बौद्धांचे मत आहे. पांच ज्ञानेन्द्रियें, पांच कमेंद्रियें, मन आणि बुद्धि, अशी ही बारा आयतने आहेत. यांची पूजा करणे ह्मणजे त्यांच्याकडून होणारी कार्य यथान्याय करवून त्यांचा निग्रह करणे,हाच पूजेचा अर्थ असावा, असे वाटते. नाही तर इंद्रियांची पूजा करणे याचा अर्थ काय, हे नीट कळत नाही. ___विवेकविलास ' ग्रंथांत बौद्ध मताचा सारांश दहा बारा श्लोकांत दिला आहे. त्यांच्या अर्थावरून बौद्धमताची कल्पना स्थल ानाने आपल्यास करता येईल. 'सुगत ' (बुद्ध) हाच बुद्धांचा देव. विश्व हे क्षणभंगुर आहे. चार तत्त्वे आहेत, त्यांना आर्यसत्त्व असें नांव आहे. १ दुःख, २ आयतन ३ समुदय आणि ४ मार्ग ही ती चार तत्त्वे होत. हा संसार दुःखमय आहे. त्याचे पांच स्कंध ( वर्ग-भाग ) आहेत. रूप, विज्ञान, वेदना, संज्ञा, आणि संस्कार ही त्या स्कंथांची नावे आहेत. पंच ज्ञानेन्द्रियें, पंच कर्मेन्द्रिये, मन आणि बुद्धि (धर्मायतन ) अशी बारा आयतने आहेत. राग, द्वेष, मोहमदादि मनोविकार आपल्या मनांत उदित होत असतात, ह्या सर्व विकारांच्या समुदायांस ' समुदय' असें म्हणतात. 'आत्मात्मीयस्वभाव ' असेंहि या समुदयाचं नांव आहे. ह्या जगांतील सर्व संस्कार क्षणिक आहेत, अशी मनाची स्थिर वासना (स्थिर बुद्धि-निश्चय किंवा खात्री ) करून घेणे, हा मोक्षाचा मार्ग होय. आणि ह्यालाच