पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० - - - - - प्रस्थानभेदः जी शक्ति असते ती होय. डोळ्याला दिसणे, कानाला ऐकू यणे वगैरे. 'चित्तचैत्तात्मक' असे जे पदार्थ किंवा विषय वर सांगितले आहेत, त्याचे पांच स्कन्ध ( भाग ) केलेले आहेत. (१) इंद्रिये आणि त्यांचे विषय ह्या दोहोमिळून जो वर्ग होतो त्याला रूपस्कन्ध म्हणतात. (२) विज्ञानस्कन्ध. ह्या स्कंधांत *आलयविज्ञान आणि प्रवृत्तिविज्ञान ह्या दोहोंचा अंतर्भाव होतो. (३) वेदनारकंधांत सुखदुःखादिकांचे ज्ञान (जाणीव) येते. (४) संज्ञारकंध. ज्यांत गाय, घोडा, मनुष्य दगड इत्यादिक विषयांच्या नांवांचा उल्लेख असतो, आणि त्या नामाबरोबर विषयांचे विज्ञानहि असते, अशा वर्गास संज्ञास्कंध म्हणतात. (५) संस्कारम्कंध हा पांचवा स्कंध आहे. ह्या स्कंधाचा वेदनास्कंधाशी निकट संबंध आहे. राग, द्वेष, क्लेश, मद, मान, धर्म, अधर्म वगैरे विकारांचा अंतर्भाव ह्यांत होतो. __ आयतनांची पूजा करावी, त्यापासून श्रेय प्राप्त होते, असें बौद्ध धर्मात सांगितले आहे. ह्याशिवाय दुसऱ्या ___*ज्या विज्ञानाचे 'अहं' हे आस्पद असते. हाणजे ज्या विज्ञानाचा आश्रय ज्ञाता (अहं ) असतो, त्या विज्ञानाला आलयविज्ञान म्हणतात. प्रवृत्तिविज्ञानांत नीलादि विषयांचा उल्लेख असतो. अहंप्रत्यय आणि इदंप्रत्यय, किंवा संवित्ति आणि प्रकटता ह्या जशा दोन जोडया आहेत, तशीच आणि त्या अर्थांची, ही जोडी आहे असे समजावे.