पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. " ह्याप्रमाणे वर सांगितलेल्या चार भावनांविषयी आपल्या मनांत पूर्णश्रद्धा ठेऊन सर्व वासना मनांतून नाहींशा करून टाकाव्यात. वासनांची निवृत्ति तत्त्वज्ञानाने होते. वासनानिवृत्ति झाली म्हणजे शून्यरूप में परम निर्वाण तें प्राप्त होते. सर्व जगत् दुःखमय आहे, तें दुःखाचें घर आहे, सर्व दुःखांची साधनें, असेंच हे जगत् आहे, अशी मनाची पक्की खात्री करून घ्यावी, आणि तत्त्वज्ञानाने दुःखाचा निरोध करून टाकावा. ह्या तत्त्वज्ञानाचे चार मार्ग आहेत. ह्या भावना हेच चार मार्ग होत. * प्रत्यक्ष अणि अनुमान ही दोनच ज्ञानसाधनें (प्रमाण) आहेत, असे बौद्धांचे मत आहे. जगांतील सुखादि जे चित्तचैतात्मक ( मन आणि मनाने जाणतां येणारे ) पदार्थ त्यांची चार कारणे ( प्रत्यय ) आहेत. त्यांची नांवें येणेंप्रमाणे:-(१) आलंबनप्रत्यय, (२) समनन्तरप्रत्यय, (३) सहकारीप्रत्यय, आणि ( ४ ) अधिपतिप्रत्यय. 'ज्ञान' ह्या शब्दाने में जाणले जाते व नीलादि विषयांचा अवभास ज्यांत होतो असें में चित्त, त्याला नीलादिकांचा आकार ज्यामुळे येतो, त्यास आवलंबनप्रत्यय म्हणतात. (२) पूर्वकाली झालेल्या ज्ञानापासून ( प्राचीन ज्ञानापासून ) प्रस्तुतकाली जे आपल्या बोधाचे स्वरूप असते, त्याला समनन्तरप्रत्यव म्हणतात. (३) प्रकाश आहे, तोपर्यंत स्पष्टता असणे, हे सहकारीप्रत्यय. आणि ( ४ ) अधिपतिप्रत्यय म्हणजे चक्षुरादि इंद्रियांत आपारला विषय ग्रहण करण्याची ।