पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ प्रस्थानभेद. दृष्टवस्तू सत् आहे असे मानले की, ह्या सर्व गोष्टीहि सर होतील. त्यांच्यापैकी एखादि दुसरी गोष्ट असत् असल तरी हरकत नाही, असे म्हणून चालणार नाही. * अ जरती न्यायाने हे म्हणणे अप्रयोजक व वेडगळपणाचे असे ठरेल. सर्व शून्य आहे. हे तत्त्व दुसऱ्या रीतीने बौद्ध सिद्ध करून दाखवितात. ह्या जगांतील कोणताहि पदार्थ. (१) सर (२) असत्, (३) सदसत् , आणि (४) सदसदेतर (हैं दोन्हीहि नाही), अशा चार कोटींपैकी एका कोणत्य तरी कोटींत असला पाहिजे. उदाहरणार्थ 'घट' घेऊ. घट हा स्वभावतःच सत् असला तर त्यास कुंभार वगैरेची जरूरी नाही. तो आपोआपच होईल. घट असत आहे, असे जर म्हणाल तर कोणत्याहि कारणामुळे, किंवा कोणाच्याहि व्यापारामुळे, त्याचे असत्त्वं जाणार नाही, पुढल्या दोन कोटी परस्पर विरोधी आहेत. म्हणजे घट हा सत् असावा किंवा असत् असावा, दोन्हीहि असू शकणार नाही. अशा कोटीक्रमाने प्रत्येक पदार्थ सत् नाही, असन्त नाही आणि सदसत् किंवा सदसदेतर नाही, असें बौद्ध प्रतिपादन करतात. म्हणजे सर्व शन्य आहे. २* अधजरतीन्याय-म्हणजे अर्धी म्हातारी. एखादि वस्तु कच्ची पक्की असली तर कच्चीचा कच्चीसारखा उपयोग करावा आणि पक्कीचा पक्कीसारखा. उदाहरणार्थ, कच्चापक्का आंबा.त्याच्या कचा भागाचे लोणचे घालावे, आणि पक्कथा भागाचा आमरस करावा, असे कधी होत नाही. ..