पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. २१७ सर्व पदार्थ असतील तर क्षणिकच असतात. विशिष्ट गुणधर्मानी युक्त अशी एखादी वस्तु कोणासारखी आहे, असा विचार करून उपमान वस्तु आपण पाहतो आहों, तोच ह्या प्रस्तुतवस्तूचे गुणधर्म क्षणांत नाहीसे होणार, तेव्हां ती वस्तु अमक्या वस्तूसारखी आहे, असे कसे सांगता येईल ? म्हणून अमुक ही वस्तू त्याच वस्तूसारखी आहे, असें म्हणावे लागते. रूपें तें रूपेंच, सोनें तें सोनेंच, इत्यादि. चवथी भावना सबै शून्यम्, शून्यम्. सर्व काही शून्य आहे. अहो ! रुपें, वगैरे पदार्थ आह्मीं स्वप्नांत किंवा जागेपणीं कधींहि पाहिले नाहीत, अशा प्रकारचा निषेध आपण नेहमी करीत असतो. अमुक ती वस्तू नाहींच असा आपला समज असतो. जे दिसतें तेंच सत् ( वस्तु ) आहे असे जर कोणी म्हणेल, तर ते म्हणणे बरोबर होणार नाही. कारण त्या वस्तूचें विशिष्ट दर्शन ( दिसणें-प्रत्यक्षज्ञान ), तिची इदंता ( वस्तुचे वस्तुत्वं ), तिचे अधिष्ठान, (ज्याचा आश्रय करून रहाते, तो आश्रय ), त्यावरचे अध्यस्त (आरोपित) आणि त्या अधिष्ठान अध्यस्तामधील समवायादि संबन्ध, ह्या सर्व गोष्टी सत् आहेत, असें मानावे लागेल.* ___* आपण एक पांढरी शुभ्र शिंप पाहिली. १ तिचे दर्शन-प्रत्य. क्षज्ञान. २ शिंपेचे शिंप असणे ( शुक्तित्व ). ३ ह्या तिच्या धर्माचे अधिष्ठान ( आश्रय ). ४ शिंप नसून ते रुपे आहे असा तिच्यावर अध्यास ( आरोप ). ५ आणि अध्यस्त व आधिष्ठान यांच्यांतील संबन्ध ही सर्व खरी पाहिजेल,