पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. कालगतीने यजनाचे प्रकार पुष्कळ वाढले आणि कार्यविस्तारही फार झाला. यावारितां होता, अध्वर्यु, उद्गाता या ऋत्विजांच्या सोईसाठी ऋक् यजु साम असे प्रयोगभेदामुळे तीन निरनिराळे वेदग्रंथ झाले. प्रवचनभेदामुळे त्यांच्या पुष्कळ भिन्न शाखा किंवा गाथा झाल्या. तथापि ब्रह्मकांडासबन्धाने सर्वांचे ऐक्यच आहे. चाराहि वेदांत काय काय सांगितले आहे ह्याची सविस्तर माहिती यथें देणे शक्य नाहीं, . तथापि प्रत्येकांत येणाऱ्या विषयांची थोडीबहुत कल्पना यावी इतकी माहिती पुढे दिली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, आणि सामवेद असे पहिल्यांदा तीन भाग ऋत्विजांच्या सोईकरितां झाले. पुढे अथर्ववेद होऊन त्यांस जोडला गेला. ह्या चारहि वेदांत ऋग्वेद हा मोठा व त्यांतील अगदी प्राचीन असा ग्रंथ आहे. या वेदाची आठ अष्टके आहेत . .त्येक अष्टकांत आठ आठ अध्याय असतात. ह्मणून एकंदर अध्याय ६४ आहेत. अध्यायांचे पोटभागास वर्ग म्हणतात. वर्गात ऋचा असतात. हे वर्ग सुमारे दोन हजार आहेत. मंत्रद्रष्टे ऋषी यांनी प्रकट केलेले मंत्र निरनिराळे आहेत, म्हणून ऋषींवरून ऋग्वेदाचे दहा भाग केले आहेत. या भागांस मंडलें असें नांव आहे. प्रत्येक मंडलांत अनुवाक असतात. अनुवाकाचे पोटांत सूक्ते, व सूक्तांत ऋचा असे ऋग्वेदाचे विभाग केले आहेत. मंडले १० आहेत; अनुवाक ८५, सूक्ते (११ वालखिल्ये धरून) १०२८ आहेत. एकंदर ऋचा १०५८०॥ आहेत. शब्द - - -