पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ प्रस्थानभेद. क्रियांचे सामर्थ्य, ही त्याच्या अंगी वर्तमान काली असतात किंवा नाही. भूत व भविष्य क्रिया करण्याचे सामर्थ्य त्या पदार्थाच्या अंगी असते, असें जर तुम्ही म्हणाल, तर वर्तमान काळी प्रस्तुतक्रिया करीत असतां, त्या क्रियाबरोबर भूत व भविष्य क्रिया घडल्या पाहिजेत. कारण तें सामर्थ्य त्यांत असते. म्हणजे तीनही कालांच्या क्रिया एकदम सुरूं राहतील. हे शक्य नाही. भतभविष्य क्रिया करण्याचे सामर्थ्य वर्तमानकाळी त्या पदार्थात नसते, असे म्हणाल तर, में सामर्थ्य त्या पदार्थात नाहींच त्याच्या साहाय्याने तोपदार्थ वर्तमान कालीन क्रिया कशी करणार ? अशाच रीतीने दुसऱ्या आक्षेपांचे निवारण करून बौद्धमताचे अनुयायी पदार्थाचे क्षणिकत्व सिद्ध करतात. . सर्वदुःखम्, दुःखम्. सर्व जगत् दुःखमय आहे ही बौद्धांची दुसरी भावना होय, जग दुःखमय आहे ही गोष्ट सर्वांस कबूल आहे. ह्याचमुळे सर्व तत्त्ववेत्ते व तीर्थंकार दुःख नाहीसे होऊन निश्रेयस कसें प्राप्त होईल, याविषयी विचार व प्रयत्न करीत असतात. सामान्य लोकांची खटपट सुद्धा यासाठींच चालली असते. बौद्ध मतांतील तिसरी भावना स्वलक्षणम्, स्वलक्षणम् ही आहे. अमुक वस्तूचे लक्षण काय ? अमें विचारले असतां, तिचे लक्षण तीच वस्तु, असा ह्या सूत्राचा अर्थ आहे. अमुक एक वस्तु कशासारखी आहे असे विचारले तर ती अमक्या दुसऱ्या वस्तूसारखी आहे; असे सांगता येत नाही. कारण