पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. २१५ कार्य उत्पन्न होते, असे आपल्यास दिसते. म्हणजे कारण आणि कार्य यांत क्रम असतो; किंवा असेंहि आपल्यास आढळून येते की कारण आणि कार्य ही समकालीन (युगपत् ) असतात. ती एकावेळेस दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी अक्रम असतो. ह्यावरून जेथें क्रिया करण्याचा धर्म ( सत्व किंवा सामर्थ्य ) असतो तेथे हा क्रम किंवा अक्रम असावयाचाच. अर्थक्रियाकारितां हें व्याप्य आहे, आणि क्रमाक्रमभाव हे त्यांचे व्यापक आहे. जेथे व्यापक वस्तू नसते, त्या ठिकाणी त्या व्यापक वस्तूनें व्याप्त असणारी वस्तु नसावयाचीच, हा तर्कशास्त्राचा नियम आहे. आता ह्या नियमाप्रमाणे बौद्ध युक्तिवाद करतात. तो असाः अक्षणिक (स्थायी) वस्तूत क्रम किंवा अक्रम नसतो, म्हणून त्यांच्यात अर्थक्रियाकारिसत्व नसते. अशारीतीने अर्थक्रियाकारिसत्त्व क्षणिक आहे, हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते, आणि तें अक्षणिकांत नाही हे अनुमाने सिद्ध करून दाखविता येते. ह्या कोटीक्रमावर कोणी अशी शंका घेतील की अक्षणिक किंवा स्थायी पदार्थात अर्थक्रियाकरिता हा धर्म का नसावा? यावर बौद्धांचे म्हणणे असें आहे. ही शंका बरोबर नाही. अक्षणिक पदार्थ अर्थक्रियाकरणारे असतात असे जर तुम्ही म्हणाल, तर आम्ही तुम्हास दोन प्रश्न विचारतो. वर्तमान काळी अक्षणिक पदार्थाकडून क्रिया घडत असतां त्या पदार्थाच्या अंगी पूर्वी त्याने केलेल्या क्रियांचे सामर्थ्य आणि तसेंच पुढे त्याकडून होणाऱ्या - -- - -