पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - -- - २१४ प्रेस्थानभेद. होतो. खरोखर आपल्या ज्ञानाशिवाय दुसरी वस्तु काही एक नाही. (३) तिसऱ्या पन्थाचे लोक 'सौत्रान्तिक' ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. ह्यांच्या मताप्रमाणे बाह्यवस्तु अनुमानाने जाणली जाते.(४) चवथ्या वैभाषिक हा चवथा पंथ होय. वर सांगितलेल्या मताभिमान्यांच्याशी वैभाषिकांचा विरोध आहे. ते म्हणतात बाह्यवस्तु प्रत्यक्ष गोचर आहे. आपल्यास इन्द्रियांच्याद्वारा ती बाह्यवन्तु समजते. ___ अशारीतीने बुद्ध मतांचे चार भिन्न भाग झाले. प्रत्येकानें आपले मत युक्तिवादानें स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. ही चार निरनिराळी बुद्धदर्शनें आहेत, असें आतां मानतात... बौद्धांची पहिली भावना किंवा सिद्धान्त असा आहे:सर्वेक्षण ( पदार्थ ) क्षणिक आहेत. म्हणजे त्यांचे अस्तित्व किंवा आयुष्य एक क्षणभर असते. असें म्हणण्याचे कारण हैं की सर्व पदार्थात अर्थाक्रिया करणारे सत्त्व असते आणि अर्थक्रिया करणारे सत्त्व जेथे असते, तेथे क्षणभंगुरता असते. उदाहरणार्थ ढग, अद्वे, सर्व वस्तु इत्यादि. अर्थक्रियाकारी तत्त्व हे क्षणभंगुर असते ही गोष्ट आपल्यास प्रत्यक्ष प्रमाणाने दिसते. ('अर्थक्रियाकारितां' म्हणजे काही तरी. फल उत्पन्न करणारे काम ( कार्य ) करण्याची शक्ति; ही शक्ति क्षणिक पदार्यात असते ). अर्थक्रिया करणारे सत्त्व हे क्षणिक वस्तूंत असते. ते अक्षणिक (स्थायी) वस्तूंत नसते. ही गोष्ट वैद्ध अनुमानानेंहि सिद्ध करून दाखवितात. तें. असें:-~~-कोणतीहि क्रिया घडली म्हणजे, कारणाच्या मागून - - -