पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौद्धदर्शन. घेत आहे. सिंहलद्वीपादि देशांत चालणान्या धर्माचा हा आधारभूत ग्रन्थ आहे. भगवान बुद्धानी चार भावना आहेत असा उपदेश केला. ह्या भावनांविषयी खात्री होऊन ज्ञान झाले असतां मुक्ति ( निर्वाण ) प्राप्त होते, असें बौद्ध मानतात. त्या चार भावना येणे प्रमाणे आहेत, (१) सर्व क्षणिकम्, क्षणिकम्. (२) दुःखंदुःखम्. (३) स्वलक्षणम्, स्वलक्षणम्. आणि (४) शून्यम्, शून्यम्. अशा ह्या चार भावना बुद्धांच्या तात्विक मताचे मूळ आहेत. प्रश्न करून मनाची खात्री करून घ्यावी, आणि त्याप्रमाणे आचरण करावे असें त्यांचे सांगणे होते. शिष्यवर्गाच्या बुद्धीचा विकास कमीजास्त असल्यामुळे त्या सर्वांना ही तत्त्वं सारखींच ग्रहण करता आली नाहीत. म्हणून त्या शिष्यवर्गात चार पन्थ उपस्थित झाले. बुद्धानी सर्व शून्य आहे असा बोध केला. हा सर्वांना समजला नाहीं. १ पहिला पंथ ' माध्यमिक' ह्या मतानुयाय्यांस आन्तरबाह्य सर्व शून्य आहे असे वाटते. ज्ञानावांचून कांहीं नाहीं ( २ ) दुसऱ्या पंथांतील लोकांस विज्ञानवादी किंवा योगाचार म्हणतात, यांच्या मताप्रमाणे बाह्यवस्तु वस्तुतः नाही, हे खरे आहे, तथापि बाह्यवस्तु आहे, असे जे आपल्यास वाटतं, त्याचे कारण असें आहे की आपल्या ज्ञानांतच त्या वाह्यवरतूंच्या आकारादिकांचा अविर्भाव होतो, म्हणजे त्या आकाराने युक्त असें आपलें विज्ञान होते, आणि ह्या विज्ञानामुळेच बाह्यवस्तूचा भास