पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ प्रस्थानभेद. ह्या विचाराने त्याचे सर्व चित्त वेधून टाकले. अशा कष्टमय स्थितींतून मनुष्याची सुटका कशी होईल, या प्रश्नाने त्याचे मन व्यग्र झाले. शेवटी सर्वसंग परित्याग करून अरण्यांत जाऊन, तेथें चिंतन करावे, असा मनांचा निश्चय करून राजवाड्यांत आणि नगरांत स्वतःच्या पुत्राच्या ( राहुलाच्या ) जन्मानिमित्त महोत्सव चालू असतां, तो आपण तेथून निघाला, तो विंध्यापर्वताचे उत्तरेस उरुवेल नांवाचें वन होते, तेथे जाऊन राहिला. पुढे अलर आणि उद्रक या आचार्यांच्याजवळ त्याने तत्त्वशास्त्राचे अध्ययन केले, आणि सात आठ वर्ष वनांत राहून, उपवासादिकष्ट सोसून ह्या गोष्टीचा विचार केला आणि नंतर आपले मतांचा प्रसार करण्यास बुद्धगौतमांनी सुरवात केली. पालीभाषेत ह्या बुद्धधर्माचे अनेक ग्रन्थ आहेत. ह्या मतावर — जातक ' नांवाची टीका आहे, ती प्रसिद्ध आहे. ललितविस्तार हा ग्रन्थ संस्कृतांत लिहिलेला आहे. काश्मीरांत जालंदर नगरांत कनिष्कराजा राज्य करीत असतां, बुद्धसंघांतील विद्वान लोकांची परिषद होऊन ह्या मताची तत्त्वे ग्रथित करण्यांत आली. ही तत्त्वे ललितविस्तारांत प्रतिपादित आहेत. तिबेट, चीन वगैरे देशांत चालं असणान्या धर्माचा हा आधारभूत ग्रन्थ आहे. अशोक राजाच्या वेळी पाटलीपुत्रांत ( पाटनाशहरों ) अशीच एक मोठी सभा ( परिषद ) भरली होती. त्या सभेनें ही आपल्या मताची स्थापना करून ती त्रिपिटक नांवाच्या ग्रन्थांत वर्णिली आहे. हा ग्रन्थ पालीभा